WCL 2024 Live Streaming: सामने कधी आणि कुठे? जाणून घ्या सर्वकाही
World Championship of Legends 2024: वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत एकूण 6 संघांमध्ये पुढील काही दिवस अटीतटीचे सामने होणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक आणि बरंच काही.
क्रिकेट चाहत्यांसाठी आजपासून 11 दिवस आपल्या दिग्गज आणि आवडत्या खेळाडूंना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशीप लिजेंड्स स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे.या स्पर्धेचं यंदाचं पहिलंच पर्व आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ आमनेसामने भिडणार आहेत. एकूण 18 सामने या स्पर्धेत होणार आहेत. या स्पर्धेत त्या त्या संघातील माजी खेळाडू हे सहभागी आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने हे नॉर्थम्पटन आणि बर्मिंगघम येथे खेळवण्यात येणार आहेत.
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स स्पर्धेच्या पहिला हंगाम 3 ते 13 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ आहेत. इंडिया, पाकिस्तान, विंडिज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे 6 संघ आहेत. प्रत्येक संघ उर्वरित 5 संघांनी 1-1 सामना खेळणार आहे. त्यानंतर 4 अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर 13 जुलै रोजी महाअंतिम सामना होईल.
6 संघ 6 कॅप्टन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृ्त्त झालेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. युवराज सिंह, युनूस खान, जॅक कॅलिस, केविन पीटरसन, ख्रिस गेल आणि ब्रेट ली या 6 जणांकडे कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली आहे.
सामन्यांचं वेळापत्रक
3 जुलै, इंडिया-इंग्लंड ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान
4 जुलै, ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान पाकिस्तान-विंडि
5 जुलै, ऑस्ट्रेलिया-साऊथ अफ्रिका इंडिया-विंडिज
6 जुलै, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया इंडिया-पाकिस्तान
7 जुलै, दक्षिण आफ्रिका-विंडिज इंग्लंड-पाकिस्तान
8 जुलै, इंडिया-ऑस्ट्रेलिया
9 जुलै, विंडिज-इंग्लंड
10 जुलै, विंडिज-ऑस्ट्रेलिया इंडिया-साउथ आफ्रिका
12 जुलै, पहिली आणि दुसरी सेमी फायनल
13 जुलै, फायनल
पाकिस्तान चॅम्पियन्स : यूनुस खान (कॅप्टन), मिस्बाह उल हक, शाहिद अफ्रिदी, कामरान अकमल, अब्दुल रझ्झाक, वाहेब रियाझ, सईद अजमल, सोहेल तन्वीर, सोहेल खान, तन्वीर अहमद, मुहम्मद हफीझ , आमीर खान, शोएब मलिक, शोएब मकसूद, शार्जिल खान आणि उमर खान
इंडिया चॅम्पियन्स टीम: युवराज सिंह (कॅप्टन), हरभजन सिंह, सुरेश रैना, इरफान पठान, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, यूसुफ पठान, गुरकीरत मान, राहुल शर्मा, नमन ओझा, राहुल शुक्ला, आरपी सिंह, विनय कुमार, धवल कुलकर्णी, अनुरीत सिंह आणि पवन नेगी.
इंग्लंड चॅम्पियन्स टीम : केविन पीटरसन, इयन बेल, उस्मान अफझल, फिलिप मस्टर्ड, ओवेस शाह, ख्रिस स्कोफिल्ड, रवी बोपारा, समित पटेल, केविन ओब्रायन, स्टुअर्ट मीकर, रायन साइडबॉटम, साजिद महमूद, टिम ब्रेसनन आणि अजमल शेहजाद.
ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स टीम: ब्रेट ली, टिम पेन, शॉन मार्श, बेन कटिंग, बेन डंक, डर्क नॅन्स, डॅन ख्रिश्चन, बेन लॉफलिन, आरोन फिंच, ब्रॅड हॅडिन, कॅलम फर्ग्युसन, पीटर सिडल, झेवियर डोहर्टी, नॅथन कुल्टर नाईल आणि जॉन हेस्टिंग्स.
वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघ: डॅरेन सॅमी, ख्रिस गेल, सॅम्युअल बद्री, रवी रामपॉल, केसरिक विल्यम्स, जेसन मोहम्मद, नवीन स्टीवर्ट, ड्वेन स्मिथ, ऍशले नर्स, सुलेमन बेन, चॅडविक वॉल्टन, जेरोम टेलर, फिडेल एडवर्ड्स, कर्क एडवर्ड्स आणि जोनाथन कार्टर.
दक्षिण आफ्रिकन चॅम्पियन्स : जॅक कॅलिस (कर्णधार), हर्शेल गिब्स, इम्रान ताहीर, मखाया एनटिनी, डेल स्टेन, ॲशवेल प्रिन्स, नील मॅकेन्झी, रायन मॅक्लारेन, जस्टिन ओंटॉन्ग, रॉरी क्लेनवेल्ड, जेपी ड्युमिनी, रिचर्ड लेव्ही, डेन विलास, व्हर्नन फिलँडर आणि चार्ल लँजवेल्ड.