जाडेजा-हार्दिकमुळे माझी आणि कुलदीप यादवची जोडी फुटली : युजवेंद्र चहल

टीम इंडियाचे फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव दोघेही एकत्र टीम इंडियामध्ये पुन्हा दिसतील, याबाबतच्या शक्यता आता मावळल्या आहेत.

जाडेजा-हार्दिकमुळे माझी आणि कुलदीप यादवची जोडी फुटली : युजवेंद्र चहल
Yuzvendra Chahal - Kuldeep Yadav
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 6:12 PM

मुंबई : टीम इंडियाचे फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yujvendra chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या दोघांना एकत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहणं एक स्वप्न झालं आहे. कारण हे दोन्ही गोलंदाज एकाच सामन्यात पुन्हा दिसतील, यात आता शंका आहे. या दोन्ही गोलंदाजांनी मिळून अनेक सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. पण दोघेही सध्या खराब फॉर्ममधून जात आहेत. (We were in Indian team till Hardik Pandya was there : Yuzvendra Chahal explains why he and Kuldeep Yadav no longer play together)

कुलदीप यादवने टीम इंडियामध्ये आपले स्थान गमावले आहे, तर चहलला अंतिम अकरामध्ये स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्याच वेळी अनेक नवे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि चांगलं प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे कुलदीप आणि युजवेंद्रला संघात स्थान मिळत नाहीये. वास्तविक, दोघांचा खराब फॉर्म तेव्हा सुरु झाला, जेव्हा ही जोडी फुटली. त्यामागे काय कारणं होती, याबाबत चहलने स्पोर्ट्स तकशी बोलताना अनेक खुलासे केले आहेत.

चहल म्हणाला की, ‘मी आणि कुलदीप यादव 2018 पर्यंत संघात एकत्र खेळलो. त्यामागे प्रमुख कारण होतं ते म्हणजे हार्दिक पंड्या. कारण हार्दिक एक वेगवान गोलंदाज आणि खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणारा आक्रमक फलंदाज आहे. तो गोलंदाजी करत असताना दोन फिरकीपटू संघात खेळवले जात होते. परंतु त्याच्या दुखापतीनंतर रवींद्र जाडेजा संघात आला आणि त्यानंतर सगळं चित्र बदललं.

चहल पुढे म्हणाला की, जाडेजा हा फिरकी गोलंदाज आणि खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणारा आक्रमक फलंदाज आहे. हार्दिक पंड्या जखमी झाल्यानंतर संघाला अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता होती, कारण परफेक्ट टीम कॉम्बिनेशनसाठी 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल, अशा गोलंदाजाची आवश्यकता होती. त्यामुळे जाडेजाला संघात स्थान दिल्यानंतर कुलदीप किंवा मला दोघांपैकी एकालाच अंतिम 11 जणांच्या संघात स्थान मिळू लागलं. आमच्या कर्णधाराला मी आणि कुलदीप दोघांपैकी एकाचीच निवड करता येत होती.

…तर मला संघाबाहेर बसण्यास हरकत नाही : चहल

चहल म्हणाला की, संघ जिंकतोय तोवर मला संघाबाहेर बसण्यास काहीच हरकत नाही. जरी मी खेळत नसलो आणि संघ जिंकत असेल तर मी आनंदी आहे. चहलने पुढे सांगितलं की, मी गेल्या वर्षी 6 महिन्यांनंतर न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळली. मला खात्री होती की मी चांगली कामगिरी करेन, कारण मी नेटमध्ये चांगली गोलंदाजी करीत होतो. मी संघाचा भाग नाही असे मला कधीही वाटले नाही. या सर्व गोष्टी आपला आत्मविश्वास टिकवून ठेवण्यात मदत करतात.

चहल आऊट ऑफ फॉर्म?

युजवेंद्र चहल अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका इंग्लंड विरुद्ध खेळला होता. यावेळी तो तीन टी-20 सामने खेळला. यात त्याला केवळ तीन बळी मिळता आले. त्यानंत चहलची आयपीएल 2021 मधील कामगिरी विशेष नव्हती. आयपीएल स्थगित करण्यापूर्वी त्याने 7 सामन्यांमध्ये केवळ 4 बळी मिळवले होते.

इतर बातम्या

गोलंदाजांची धुलाई करण्यासाठी विराट-डिव्हिलियर्स जी बॅट वापरतात, ती कुठे आणि कोणत्या लाकडापासून बनते?

IPL च्या उरलेल्या 31 मॅचचं वेळापत्रक तयार, 29 तारखेला BCCI मोठी घोषणा करणार?

सौदी अरेबियाची मॉडेल ते इरफान पठाणची बायको, पहा किती झाला बदल?

(We were in Indian team till Hardik Pandya was there : Yuzvendra Chahal explains why he and Kuldeep Yadav no longer play together)

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.