WI vs SA: दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20 सीरिजसाठी विंडिज संघाची घोषणा, कुणाला संधी?
West Indies vs South Africa T20I Schedule: दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका पार पडली. त्यानंतर आता उभयसंघात टी20i मालिका खेळवण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका ही 1-0 अशा फरकाने जिंकली. उभयसंघातील पहिला सामना हा बरोबरीत सुटला. त्यानंतर दुसरा सामना हा दक्षिण आफ्रिकेने जिंकला आणि मालिकाही खिशात घातली. त्यानंतर आता दोन्ही संघात टी 20i मालिका होणार आहे. ही मालिका एकूण 3 सामन्यांची असणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेत रोव्हमन पॉवेल हा वेस्ट इंडिजचं नेतृत्व करणार आहे. तर रोस्टन चेस याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबादारी असणार आहे. या मालिकेला 23 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना हा 25 तर तिसरा आणि अंतिम सामना हा 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने हे ब्रायन लारा क्रिकेट एकादमी येथे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका जिंकली आहे. त्यानंतर आता पाहुण्या संघाचा टी20i सीरिज जिंकण्याचा मानस असणार आहे. तर विंडिज ही मालिका जिंकून हिशोब बरोबर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. आता या प्रयत्नात कोण यशस्वी ठरतं? हे लवकरच ठरेल. दरम्यान आता दोन्ही संघांना पुढील 4 दिवस विश्रांती असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना टी 20i सीरिजसाठी काही दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
टी 20i मालिकेसाठी विंडिज टीम
CWI announces T20 squad for the #T20Fest against South Africa in Trinidad!🇹🇹🔥
Read More⬇️ https://t.co/qKOerGXZNp#T20Fest #WIvSA pic.twitter.com/6vvXuxfkKz
— Windies Cricket (@windiescricket) August 18, 2024
टी 20I मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 23 ऑगस्ट, शुक्रवार
दुसरा सामना, 25 ऑगस्ट, रविवार
तिसरा सामना, 27 ऑगस्ट, मंगळवार
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी विंडिज टीम: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस (उपकर्णधार), ॲलिक अथानाझे, जॉन्सन चार्ल्स, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, फॅबियन ॲलन, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ओबेद मॅककॉय, गुडाकेश मोटी, निकोलस पूरन, शेरफन रुदरफोर्ड आणि रोमॅरियो शेफर्ड.