T20 World Cup 2024 : वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज टीम जाहीर, विस्फोटक फलंदाजांचा समावेश

West Indies T20 World Cup 2024 Squad : वेस्ट इंडिजच्या टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये एकसेएक आणि तोडीसतोड हार्ट हिटर फलंदाजांचा समावेश आहे. पाहा संपूर्ण टीम.

T20 World Cup 2024 : वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज टीम जाहीर, विस्फोटक फलंदाजांचा समावेश
west indies cricket team,Image Credit source: icc
Follow us
| Updated on: May 03, 2024 | 10:25 PM

टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी यजमान वेस्ट इंडिज टीमची घोषणा करण्यात आली आहे. तर रोवमॅन पॉवेल हा कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर अल्झारी जोसेफ उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. तर शिमरॉन हेटमायर याचं कमबॅक झालं आहे. निवड समितीने अनेक स्टार खेळाडूंना संधी दिली आहे. त्यानुसार युवा वेगवान गोलंदाज शामर जोसेफ याला संधी दिली आहे. शामरने या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. शामरने गाबात विंडिजला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. विंडिजला 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करता आलं नव्हंत. मात्र यंदा विंडिज यजमान असल्याने त्याने थेट एन्ट्री मिळाली आहे.

विस्फोटक खेळाडू

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आतापर्यंत आयपीएलच्या 17 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी केली आहे. विंडिजच्या संघात एकसेएक आणि तोडीसतोड फंलदाज आहेत. त्यामुळे अवघ्या काही दिवसांनी सुरुवात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत इतर संघांना या यजमान आणि विस्फोटक बॅटिंग करणाऱ्या संघापासून सावध रहावं लागणार आहे.

या खेळाडूने नाकारली ऑफर

आयपीएलच्या 17 व्या मोसमात केकेआरसाठी खेळणाऱ्या ऑलराउंडर सुनील नरेन याने वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची ऑफर नाकारली. विंडिज संघाचा हेड कोच डॅरेन सॅमीने नरेनला वर्ल्ड कपमध्ये खेळण्यास सांगितलं होतं. मात्र नरीनने निवृत्तीतून माघार घेण्यास नकार दिला. सुनीलने गेल्याच वर्षी निवृत्ती घेतली होती. नरेनने निवृत्तीतून पुनरागमन करत वर्ल्ड कपमध्ये खेळावं, असं रोवमॅन पॉवेल म्हणाला होता. मात्र नरीन आपल्या न खेळण्याच्या निर्णयावर ठाम राहिला.

वर्ल्ड कप विंडिज टीम

विंडिज कोणत्या ग्रुपमध्ये?

वेस्ट इंडिज वर्ल्ड कपसाठी सी ग्रुपमध्ये आहे. विंडिजसह न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनिआ आणि यूगांडाचा समावेश आहे. विंडिज आपला सलामीचा सामना हा 2 जून रोजी पापुआ न्यू गिनिआ विरुद्ध खेळणार आहे.

वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज टीम : रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड आणि रोमॅरियो शेरफर्ड.

वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.