ग्राऊंडवर साडे 6 फुट उंचीच्या बोलरचं वादळ, 40 रनवर 8 विकेट गेल्यानं इंग्लंडच्या टीमचं सरेंडर

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांची चर्चा होते तेव्हा पहिले नाव वेस्ट इंडिजचे येते.West Indies fast bowler

ग्राऊंडवर साडे 6 फुट उंचीच्या बोलरचं वादळ, 40 रनवर 8 विकेट गेल्यानं इंग्लंडच्या टीमचं सरेंडर
वेस्ट इंडीज
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 5:12 PM

मुंबई: जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांची चर्चा होते तेव्हा पहिले नाव वेस्ट इंडिजचे येते. या संघाच्या वेगवान गोलंदाजांनी जवळपास 3 दशके क्रिकेट विश्वावर राज्य केले. अँडी रॉबर्ट्स आणि मायकेल होल्डिंगपासून कर्टनी वॉल्श आणि कर्टनली अ‍ॅम्ब्रोज असे वेगवान गोलंदाज विंडीजकडे होते. हे गोलंदाज होते विरोधी संघांच्या फलंदाजांना काही षटकांत गुडघे टेकायला लावायचे. कर्टनली अ‍ॅम्ब्रोज या वेगवान गोलंदाजानं 28 वर्षांपूर्वी त्रिनिदादमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले होते. (West Indies fast bowler Curtly Ambrose taken six wicket against England on this day in 1994)

कॅरिबियन दौर्‍यावर गेलेल्या इंग्लंडच्या संघाला 29 मार्चला कर्टनली अ‍ॅम्ब्रोजच्या वादळाचा सामना करावा लागला. त्यानं इंग्लंडच्या संघाच्या धुव्वा उडवला होता. दोन्ही संघातील कसोटी मालिकेचा तिसरा सामना त्रिनिदादमध्ये खेळला जात होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने पहिल्या डावात 252 धावा केल्या तर इंग्लंडने 328 धावा करून 76 धावांची आघाडी मिळविली. यानंतर वेस्ट इंडीजने दुसर्‍या डावात 269 धावा केल्या आणि इंग्लंडला 194 धावांचे लक्ष्य दिले.

इंग्लंडला वादळाची कल्पना नव्हती

194 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडच्या चौथ्या दिवसातील अखेरच्या सत्रात मैदानावर उतरला. त्यावेळी 15 ओव्हरचा खेळ बाकी होता. पाचव्या दिवसाचा खेळ बाकी असल्यानं इंग्लडच्या विजयाची शक्यता जास्त होती. सामन्यातील चौथ्या डावात अखेरच्या दोन दिवसात फलंदाजी करणे नेहमीच अवघड असते. हे इंग्लंडलाही माहिती होते. पण 46 धावांवर संघाला गाशा गुंडाळावा लागेल, याची कल्पना त्यांना नव्हती.

केवळ 15 ओव्हरमध्येच इंग्लंडचा धुव्वा

कर्टनली अ‍ॅम्ब्रोजनं दुसर्‍या डावाच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला धक्का देत मायकेल अ‍ॅथर्टनला एलबीडब्ल्यू बाद केले. त्यानंतर पुढं इंग्लंडचे आणखी दोन खेळाडू बाद झाले. ज्यात एक रन आऊ आणि एक विकेट अ‍ॅम्ब्रोसनं घेतली होती. केवळ 5 धावांवर 3 विकेट गेल्यानंतर एलेक स्टीवर्टनं इंग्लंडचा डाव सावरला. कर्टनली अ‍ॅम्ब्रोजच्या रुपानं इंग्लंडवर आभाळ कोसळलं. 6 फूट 7 इंच उंचीच्या अ‍ॅम्ब्रोजनं इंग्लंडच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. कर्टनली अ‍ॅम्ब्रोजनं 8 ओव्हरमध्ये इंग्लंडच्या 6 विकेट घेतल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लडच्या 8 बाद 40 धावा झाल्या होत्या.

इंग्लंडचा डाव 46 धावांवर आटोपला

अ‍ॅम्ब्रोजच्या या जबरदस्त कामगिरीनं सर्वांनाच चकित केले. सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडचे फलंदाज केवळ 4 षटक फलंदाजी करु शकले. कर्टनी वॉल्शनं अखेरच्या दोन विकेट्स घेत वेस्ट इंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडीजनं हा सामना 147 धावांनी जिंकला.

संबंधित बातम्या :

IND vs ENG : सॅम करनच्या जबरदस्त खेळीमागे महेंद्रसिंह धोनीचा हात?

Virat Kohli | शानदार, जबरदस्त ! इंग्लंडवर 7 धावांनी विजय, कर्णधार विराटचं अनोखं ‘द्विशतक’, मानाच्या पंक्तीत स्थान

(West Indies fast bowler Curtly Ambrose taken six wicket against England on this day in 1994)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.