WI vs NED | वेस्ट इंडिज विरुद्ध Super Over मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, लोगान वॅन बीकने असा रचला इतिहास, VIDEO

| Updated on: Jun 27, 2023 | 9:35 AM

WI vs NED | वेस्ट इंडिजने नेदरलँड्सच्या टीमला विजयासाठी 375 धावांच टार्गेट दिलं होतं. शेवटच्या चेंडूवर 1 बॉलमध्ये 1 रन्सची आवश्यकता होती. पण कॅरेबियाई गोलंदाज अल्जारी जोसेफने डच बॅट्समनला आऊट केलं.

WI vs NED | वेस्ट इंडिज विरुद्ध Super Over मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, लोगान वॅन बीकने असा रचला इतिहास, VIDEO
world cup qualifier match WI vs NED
Image Credit source: instagram
Follow us on

नवी दिल्ली : वनडे असो व T20 क्रिकेट. तुम्ही सुपर ओव्हर खूप बघितल्या असतील. त्याचा रोमांच अनुभवला असेल. पण वनडे वर्ल्ड कप 2023 च्या क्वालिफायर फेरीत सुपर ओव्हरमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड झाला. नेदरलँडस आणि वेस्ट इंडिजमध्ये सामना होता. 26 जूनला हा सामना खेळला गेला. विजेता संघ नेदरलँड्सने हा रेकॉर्ड बनवला. त्याचसोबत नेदरलँडच्या लोगान वॅन बीकच्या नावावर सुद्धा एका वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली. त्याने नेदरलँड्सच्या विजयाची स्क्रिप्ट लिहीली.

नेदरलँडस आणि वेस्ट इंडिजमध्ये हायस्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. धावांचा पाऊस या सामन्यात पडला. मॅचचा फैसला सुपर ओव्हरमध्ये झाला. वेस्ट इंडिजने नेदरलँड्सच्या टीमला विजयासाठी 375 धावांच टार्गेट दिलं होतं. शेवटच्या चेंडूवर 1 बॉलमध्ये 1 रन्सची आवश्यकता होती. पण कॅरेबियाई गोलंदाज अल्जारी जोसेफने डच बॅट्समनला आऊट केलं. त्यामुळे क्वालिफारची मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली.

सुपर ओव्हरमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड्सने पहिली बॅटिंग केली. अनुभवी ऑलराऊंडर लोगान वॅन बीक स्ट्राइकवर होता. तो सुपर ओव्हरचे सर्व चेंडू खेळला. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर बॉलिंग करत होता. त्याच्या ओव्हरमध्ये लोगानने 30 धावा फटकावल्या. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. वनडे किंवा t20 मध्ये सुपर ओव्हरमध्ये कधीही 25 पेक्षा जास्त धावा झालेल्या नाहीत.

सुपर ओव्हरमध्ये असा झाला वर्ल्ड रेकॉर्ड

लोगान वॅन बीकने सुपर ओव्हरमध्ये 30 धावा कशा फटकावल्या त्या जाणून घ्या. जेसन होल्डरच्या पहिल्या बॉलवर चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर सिक्स मारला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा फोर. त्यानंतर सलग दोन बॉलवर दोन सिक्स मारले. पुन्हा लास्ट बॉलवर चौकार मारला.


सुपर ओव्हरमध्ये अशी झाली वेस्ट इंडिजची हालत

आता वेस्ट इंडिजला विजयासाठी 31 रन्स हव्या होत्या. पण कॅरेबियाई टीम असं करु शकली नाही. लोगान वॅन बीकनेच वेस्ट इंडिजच्या इराद्यावर पाणी फिरवलं. वेस्ट इंडिजला त्याने सुपर ओव्हरमध्ये फक्त 8 धावाच करु दिल्या. त्याशिवाय दोन विकेट काढले. जॉन्सन चार्ल्स आणि जेसन होल्डर यांना चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर बाद केलं. म्हणजेच वेस्ट इंडिजची टीम सुपर ओव्हरचे 6 चेंडू सुद्धा पूर्ण खेळली नाही.


लोगान वॅन बीकने रचला इतिहास

वेस्ट इंडिज विरुद्ध विजयात नेदरलँड्सने सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक 30 धावांचा रेकॉर्ड केला. पण त्याशिवाय सुपर ओव्हरचे सर्व चेंडू खेळणारा लोगान वॅन बीक क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज ठरलाय. त्याशिवाय त्याने सुपर ओव्हरमध्ये दोन विकेटही काढले.