WI vs ENG 3rd Odi : विंडिज विरुद्ध इंग्लंड तिसरा आणि अंतिम सामना, कोण जिंकणार मालिका?
West Indies vs England 3rd Odi Live Streaming : वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना हा चुरशीचा होणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. यजमान विंडिजने पाहुण्या इंग्लंडवर पहिल्या सामन्यात डीएलएसनुसार 8 विकेट्सने मात करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या आणि ‘करो या मरो’ अशा सामन्यात वेस्ट इंडिजवर 5 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा सामना हा चुरशीचा आणि रंगतदार होणार, यात अजिबात शंका नाही. दोन्ही संघांना मालिका विजयाची बरोबरी संधी आहे. मात्र दोघांपैकी कुणी एकच सामना आणि मालिका जिंकेल. त्यामुळे या सामन्याच्या निकालाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
विंडिज विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना केव्हा?
विंडिज विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी 6 नोव्हेबंरला होणार आहे.
विंडिज विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना कुठे?
विंडिज विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना केनिंगस्टन ओव्हल, ब्रिजटाऊ, बारबाडोस येथे खेळवण्यात येणार आहे.
विंडिज विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
विंडिज विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 11 वाजता टॉस होईल.
विंडिज विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?
विंडिज विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर भारतात दाखवण्यात येणार नाही. तर हा सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे पाहता येईल.
इंग्लंड क्रिकेट टीम : लियाम लिव्हिंगस्टोन (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, जेकब बेथेल, सॅम कुरन, डॅन मौसली, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, जॉन टर्नर, जेमी ओव्हरटन, मायकेल-काईल पेपर , रेहान अहमद, रीस टोपली आणि जाफर चोहान
वेस्ट इंडिज क्रिकेट टीम : शाई होप (कर्णधार आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, एविन लुईस, केसी कार्टी, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, गुडाकेश मोटी, मॅथ्यू फोर्ड, जेडेन सील्स, शामर जोसेफ, अल्झारी जोसेफ, रोमॅरिओ, शेफर्ड अँड्र्यू आणि हेडन वॉल्श.