आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीतील 20 व्या आणि शेवटच्या सामन्यात बी ग्रुपमधील इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज दोन्ही संघ आमनेसामने आहेत. हीदर नाईट हीच्याकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. हेली मॅथ्यूज विंडिजचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. विंडिजने नाणेफेक जिंकली. कर्णधार हेली हीने बॉलिंगचा निर्णय घेत इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. ए ग्रुपमधून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. मात्र या बी ग्रुपमधून अद्याप कोणताही संघ निश्चित झालेला नाही. त्यामुळे या सामन्याच्या निकालानंतर उपांत्य फेरीच्या शर्यतीत असलेले 3 पैकी 2 संघ निश्चित होतील.
बी ग्रुपमधून बांगलादेश आणि स्कॉटलँड हे दोन्ही संघांचा साखळी फेरीतूनच पॅकअप झालंय. त्यामुळे आता उपांत्य फेरीसाठी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात स्पर्धा आहे. दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हा +1.382 असा आहे. तर इंग्लंड आणि विंडिजचा हा चौथा आणि शेवटचा सामना आहे. इंग्लंडने 3 पैकी 3 सामने जिंकेलत. तर विंडिजने 3 मधून 1 सामना गमावलाय तर 2 वेळा विजय मिळवलाय. इंग्लंड आणि विंडिजचा +1.716 आणि +1.708 असा आहे.
विंडिजचा नेट रनरेट हा दक्षिण आफ्रिकेपेक्षा सरस आणि इंग्लंडच्या आसपास आहे. त्यामुळे विंडिजला हा सामना जिंकून उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी आहे. मात्र विंडिजने हा सामना गमावला तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यामुळे या सामन्यातच्या निकालानंतर कोण उपांत्य फेरीत पोहचेल? हे निश्चित होईल.
विंडिजने टॉस जिंकला, इंग्लंडची बॅटिंग
West Indies win the toss and elect to bowl in their all-important clash against England in the Women’s #T20WorldCup 2024 👊#WhateverItTakes #ENGvWI
Live report ⬇https://t.co/7aWobv7kjr
— ICC (@ICC) October 15, 2024
इंग्लंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हीदर नाइट (कॅप्टन), माइया बाउचियर, डॅनिएल व्याट-हॉज, ॲलिस कॅप्सी, नॅट स्कायव्हर-ब्रंट, एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनियल गिब्सन, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन आणि लॉरेन बेल.
वेस्ट इंडिज वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हेली मॅथ्यूज (कॅप्टन), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, चेडियन नेशन, झैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, आलिया ॲलेने, एफी फ्लेचर आणि करिश्मा रामहरक