Outstanding Catch : काय कॅच घेतला राव! शशांकला पाहून श्रेयस अय्यर शॉक, पाहा Highlights Video
हैदराबादला 178 धावांचं टार्गेट कोलकाताने दिलंय. आता या लक्ष्याला हैदराबाद पूर्ण करणार का, ते पहावं लागेल.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद (SRH) सामना सुरु आहे. 61 वा सामना आज खेळला जात आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य ठेवलंय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकातानं 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक धावा केल्या. या सामन्यात सर्वाधिक चर्चा शशांकच्या कॅचची होतेय. केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. व्यंकटेश अय्यरला मार्को यानसेननं 7 धावा करून बाद केले. यानंतर अजिंक्य रहाणे आणि नितीश राणा यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. 16 चेंडूत 26 धावा करून राणा उमरान मलिकचा बळी ठरला. त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. उमराननेही रहाणेला त्याच्या पहिल्याच षटकात बाद केले. शशांक सिंगने (shashank singh) त्याचा अप्रतिम झेल टिपला. दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या अय्यरचा या झेलवर विश्वास बसत नव्हता. शशांकच्या झेलची चांगलीच चर्चा झाली.
शशांकचा अप्रतिम कॅच, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Keeps his eyes on the ball ✅ Maintains his balance ✅ Completes a superb grab ✅
Sit back & relive @shashank2191‘s outstanding catch near the ropes ? ? #TATAIPL | #KKRvSRH | @SunRisers https://t.co/IX39wLlHLi
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2022
केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक धावा केल्या. तो 28 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिला. मलिकने एकाच षटकात या दोघांनाही परत पाठवले. पुढच्या षटकात श्रेयस अय्यरची विकेट घेतली. त्यानंतर टी नटराजनने केकेआरच्या रिंकू सिंगला एलबीडब्ल्यू केलं. पंचाने त्यानंतर त्याला बाद केलं. पण तरिही रिंकू हा खेळपट्टीवर उभा राहिल. यानंतर गोंधळ उडाला होता. दरम्यान, हैदराबादला 178 धावांचं टार्गेट कोलकाताने दिलंय. आता या लक्ष्याला हैदराबाद पूर्ण करणार का, ते पहावं लागेल.
नवा विक्रम, 2000 धावा
केकेआरचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम केला आहे. चेंडूंच्या बाबतीत तो सर्वात जलद 2000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
आंद्रेचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अजिंक्य रहाणे बाद
उमरान मलिकने आपल्या पहिल्याच षटकात कोलकात्याच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून शानदार सुरुवात केली आहे. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर उमरानने अजिंक्य रहाणेला शशांककडून झेलबाद केले. उमरानच्या झेललेल्या चेंडूवर रहाणेने स्वीपर कव्हरच्या दिशेने हवेत शॉट खेळला पण शशांकने सीमारेषेजवळ धावताना सर्वोत्तम झेल टिपला.
अजिंक्य रहाणेची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हैदराबादला 178 धावांचं टार्गेट
पुण्यातील एमसीए स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य ठेवलंय