क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानात आश्चर्यकारक घटना घडत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण आम्ही ज्या बद्दल बोलतोय तशी गोष्ट पहिल्यांदा घडली आहे. हा विषय एका कॅचशी संबंधित आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही आतापर्यंत अनेक कॅचेस पाहिल्या असतील, पण कधी कोणाला बुटाच्या मदतीने कॅच पकडताना पाहिलय का?बुटाच्या मदतीने कॅच ही गोष्ट हैराण करते. पण ती तितकी खरी सुद्धा आहे. कुठला आंतरराष्ट्रीय सामना किंवा मोठ्या क्रिकेट लीगमध्ये हे घडलेलं नाही, युरोपियन क्रिकेट लीगमध्ये हे पहायला मिळालय.
3 ऑगस्टला PLE आणि AFK मध्ये सामना झाला. T10 फॉर्मेटमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात AFK ने पहिली बॅटिंग केली. 10 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 104 धावा केल्या. प्रत्युत्तरात PLE ची टीम 10 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून फक्त 40 धावाच बनवू शकली. PLE ने हा सामना 64 धावांनी गमावला.
त्या प्लेयरच नाव काय?
टीमच्या जय-पराजयामध्ये एका कॅचने लक्ष वेधून घेतलं. बुटाच्या मदतीने ही कॅच पकडली. AFX चा प्लेयर कुर्शद डलयानीने ज्या अंदाजात ही कॅच पकडली, त्यावरुन त्याचं फुटबॉल कौशल्य सुद्धा दिसून आलं. डलयानने आधी चेंडूला येऊ दिलं. त्यानंतर चेंडू जमिनीवर पडण्याआधी बुटाच्या सहाय्याने उचचलं. फुटबॉल ज्या प्रमाणे उचलतो, तसा त्याने तो छोटा चेंडू हवेत उडवला व कुर्शद डलयानने कॅच घेतली.
Ever seen anything like this?😱
Kurshad Dalyani, you beauty!#EuropeanCricket #EuropeanCricketSeries #StrongerTogether pic.twitter.com/x0reWpnOb4
— European Cricket (@EuropeanCricket) August 4, 2024
बॅटिंग करताना कुर्शद डलयानने एकही रन्स केला नाही. विकेट घेतला नाही. संपूर्ण सामन्यात कमालीचा राहिलो तो त्याने पकडलेला झेल. सोशल मीडियावर आता या कॅचचा व्हिडिओ व्हायरल झालाय.