राजकोट कसोटी दरम्यान अश्विनच्या घरी नेमकं काय घडलं होतं? पत्नीने आता सर्वकाही केलं उघड

इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना राजकोट येथे पार पडला. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विनने 500 विकेट्सचा टप्पा गाठला होता. त्यामुळे अश्विन या सामन्यात आणखी गडी बाद करणार असं चाहत्यांना वाटलं होतं. पण आर अश्विनला सामना मध्यातच सोडून घरी जावं लागलं. त्याची पुसटशी कारणं लोकांना माहिती होती. पण आता आर अश्विनच्या पत्नीने सर्व उलगडा केला आहे.

राजकोट कसोटी दरम्यान अश्विनच्या घरी नेमकं काय घडलं होतं? पत्नीने आता सर्वकाही केलं उघड
राजकोट कसोटी मध्यातच सोडून जाण्याचं कारण आलं समोर, आर अश्विनच्या पत्नीने सर्वकाही सांगितलं
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 3:21 PM

मुंबई : आर अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत अनेक विक्रम रचले आहेत. पाचवा कसोटी सामना खेळताच आर अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. अश्विन 100 कसोटी सामना खेळणारा 14 वा भारतीय खेळाडू ठरणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक वेळ अशी आली की अश्विनला सामना अर्धवट सोडून घरी परतावं लागलं होतं. घरी काहीतरी गडबड झाली असावी असा अंदाज क्रीडाप्रेमींनी मांडला होता. त्यानंतर आर अश्विनच्या पत्नीने 500 वी विकेट ते 501 व्या विकेट दरम्यान बरंच काही घडल्याचं सांगितलं होतं. आता आर अश्विनच्या पत्नीने खरं काय झालं ते सांगून टाकलं आहे. राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आर अश्विन मैदानात दिसला नाही. थेट चौथ्या दिवशी आर अश्विन चार्टर्ड प्लेनने राजकोटला पोहोचला आणि गोलंदाजी केली. तसेच एक विकेट घेतली. पण त्या 24 तासात बरंच काही घडल्याचं आर अश्विनच्या पत्नीने सांगितलं आहे.

“अश्विनची आई त्या दिवशी घरात पडली होती आणि त्यासाठी अश्विनला रात्रीत घरी फ्लाइट पकडून यावं लागलं होतं.”, असं आर अश्विनच्या पत्नीनं सांगितलं आहे आहे. या घटनेबाबत आर अश्विनने सोशल मीडियावर काहीच लिहिलं नाही. इंडियन एक्स्प्रेसच्या कॉलममध्ये अश्विनच्या पत्नीने लिहिलं की, “अश्विनची आई अचानक पडली. त्यानंतर कुटुंबियांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर अश्विनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.”

या घटनेनंतर अश्विनच्या पत्नीने थेट त्याला फोन न करता पुजाराला केला. अश्विनची पत्नी प्रीतीने सांगितलं की, ‘सामन्यादरम्यान मुलं शाळेतून घरी परतली होती आणि त्याने 500 वी विकेट घेतली. आम्ही सर्वांना फोनवरून शुभेच्छा देत होतो. तेव्हा आई पडल्याचा अचानक आवाज आला आणि आमची धावाधाव झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी अश्विनला तात्काळ घरी पाठवलं. अश्विन घरी रात्री उशिरा आला तेव्हा आई आयसीयूत होती. आईनेच पुढच्या दिवशी परत जाण्याची विनंती केली. पण अश्विनला आईसोबत राहायचं होतं.’

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.