दिनेश कार्तिकच्या रुममध्ये नेमकं काय घडलं? भीतीच्या सावटाखाली काढावी लागली रात्र
भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 2013 मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असताना रुममध्ये भीतीच्या सावटाखाली रात्र काढल्याचं त्याने सांगितलं.
दिनेश कार्तिकने टीम इंडियानंतर आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती. या वर्षी दिनेश कार्तिक शेवटची आयपीएल स्पर्धा खेळला होता. त्यानंतर दिनेश कार्तिक समालोचकाच्या भूमिकेत दिसला होता. पण आता दिनेश कार्तिकची फटकेबाजी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. दक्षिण अफ्रिकेतील SA T20 लीग स्पर्धेत भाग घेणार आहे. राजस्थान रॉयल्स फ्रेंचायसीची टीम पार्ल रायल्समध्ये खेळताना दिसणार आहे. असं असताना दिनेश कार्तिकने आपल्या आयुष्यातील एक किस्सा शेअर केला आहे. त्याचा हा अनुभव ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. 2013 साली दक्षिण अफ्रिका दौऱ्यात ही घटना घडल्याचं दिनेश कार्तिकने सांगितलं. दिनेश कार्तिकने सांगितलं की, जेव्हा 2013 मध्ये संघाने दक्षिण अफ्रिका दौरा केला होता. तेव्हा भीतीदायक रात्रीचा सामना करावा लागला होता. रात्रीच्या दरम्यान रुममध्ये काही हालचाल जाणवली होती. पण काय होतं ते दिनेश कार्तिकने माहिती नाही.
भारतीय संघ 2013 मध्ये त्रिकोणीय मालिका खेळण्यासाठी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर गेली होती. त्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात पराभूत करत मालिका नावावर केली होती. “जेव्हा आम्ही सन सिटीमध्ये राहत होतो, तेव्हा मला खोलीत काहीतरी विचित्र हालचाल जाणवत होती,” कार्तिकने क्रिकबझवरील संभाषणादरम्यान हा खुलासा केला . दिनेश कार्तिक दक्षिण अफ्रिकेत खेळण्यासाठी सज्ज आहे. या लीगमध्ये खेळणार पहिला भारतीय आहे.
दिनेश कार्तिकने सांगितलं की, ‘ दक्षिण आफ्रिकेत खेळण्यासाठी आणि तिथे जाण्याच्या खूप आठवणी आहेत. त्यामुळे संधी आली तेव्हा मी नाही म्हणू शकलो नाही कारण स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणे आणि ही अविश्वसनीय स्पर्धा जिंकणे खूप छान असेल. पार्ल रॉयल्स संघात सामील होताना मला खूप आनंद होत आहे. मी नक्कीच या संघात सामील होण्यासाठी आणि एका रोमांचक पर्वात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.’ दिनेश कार्तिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 26 कसोटी, 94 वनडे आणि 60 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. या व्यतिरिक्त 167 फर्स्ट क्लास, 260 लिस्ट ए आणि 401 टी20 सामने खेळला. कार्तिकने कसोटीत 1025, वनडेत 1725 आणि टी20 क्रिकेटमध्ये 686 धावा केल्या आहेत.