IPL 2025 : आयपीएलमध्ये खेळाडूंचं रिटेन्शन म्हणजे नेमकं काय? इथपासून सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
आयपीएल 2025 स्पर्धेसाठी आतापासून जय्यत तयारी सुरु झाली आहे. संघ बांधणीसाठी खेळाडूंची अधिक वजाबाकी सुरु झाली आहे. प्रत्येक फ्रेंचायझी सध्याच्या संघातील फक्त 6 खेळाडूंना रिटेन करू शकणार आहेत. राखून ठेवलेल्या खेळाडूंसाठी 79 कोटी रुपयांची रक्कम मोजावी लागेल. तर पाच खेळाडूंसाठी 75 कोटींची रक्कम असेल.
आयपीएलच्या 18 व्या पर्वासाठीची खलबतं आता संपली असून पूर्वतयारी सुरू झाली आहे. 31 ऑक्टोबरला रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सुपूर्द करायची आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही वेळ असणार आहे. या यादीतून वगळलेल्या खेळाडूंना मेगा लिलावात पुन्हा नाव नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना प्रचंड उत्सुकता लागून आहे. खेळाडूंना रिटेन करण्याबाबत काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींसमोर अनेक प्रश्न पडले आहेत. किती खेळाडू रिटेन करता येतील? रिटेन्शन म्हणजे काय? अनकॅप्ड खेळाडू म्हणजे काय असतं? वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे मिळतील. तत्पूर्वी आयपीएल रिटेन्शनची रुपरेषा समजून घेऊयात. दर तीन वर्षांनी मेगा लिलावाची प्रक्रिया पार पडते. त्यामुळे काही ठरावीक खेळाडूंना संघात कायम ठेवून इतर खेळाडू लिलावासाठी मोकळे केले जातात. त्या खेळाडूंच्या बेस प्राइसवरून त्या खेळाडूंसाठी बोली लागते. कधी कधी फ्रेंचायझीने सोडून दिलेले खेळाडू परत घेण्यासाठी दमछाक होते. त्यामुळे ही प्रक्रिया काय असते ते समजून घेऊयात.
आयपीएल रिटेन किंवा रिटेन्शन म्हणजे काय?
खेळाडूला रिटेन करणं म्हणजे त्या खेळाडूला आपल्या संघासोबत कायम ठेवणे. जर संघात 18 खेळाडू असतील तर त्यापैकी 6 खेळाडूंना रिटेन म्हणजे कायम ठेवता येईल. तसेच इतर 12 खेळाडू मेगा लिलावासाठी सोडून दिले जातील.
एका संघाला किती खेळाडू रिटेन करण्याची परवानगी?
आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी आलेल्या नियमानुसार प्रत्येक फ्रेंचायझीला जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेवता येतील. यातही एक खेळाडू अनकॅप्ड असावा अशी अट आहे.
अनकॅप्ड खेळाडू म्हणजे कोण?
अनकॅप्ड खेळाडू म्हणजे त्या खेळाडूने टीम इंडियासाठी एकही सामना खेळालेला नाही. दुसरीकडे, एखादा खेळाडू टीम इंडियासाठी गेली 5 वर्षे खेळला नसेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केलं जातं.
रिटेन केलेल्या खेळाडूंना किती रक्कम देता येते?
फ्रेंचायझींना सहा खेळाडूंना संघात कायम ठेवण्यासाठी 79 कोटी रुपये मोजता येतील. त्यात पाच कॅप्ड प्लेयर्ससाठी 75 कोटी असतील. म्हणजेच अनकॅप्ड प्लेयरसाठी 4 कोटी रक्कम ठरवली आहे.
रिटेन केलेल्या खेळाडूला जास्तीत जास्त किती रक्कम देता येईल?
संघात पाच कॅप्ड प्लेयर कायम ठेवल्यास 75 रुपये द्यावे लागली. ही रक्कम त्यांच्या किमतीप्रमाणे विभागली जाऊ शकते. म्हणजेच दोन खेळाडूंसाठी 25+25 कोटी मोजले. तर उर्वरित तीन खेळाडूंसाटी 10+10+5 कोटी अशी विभागणी करता येऊ शकते. ही विभागणी फ्रेंचायझीने त्यांच्या मागणीनुसार ठरवायची आहे.
फ्रेंचायझींना कमीत कमी किती खेळाडू रिटेन करता येतील?
पाच पेक्षा कमी खेळाडू रिटेन करण्याचा विचार असेल तर पहिल्या खेळाडूसाठी 18 कोटी, दुसर्या खेळाडूसाठी 14 कोटी, तिसऱ्या खेळाडूसाठी 11 आणि चौथ्या खेळाडूसाठी 18 कोटी रुपये असतील. म्हणजेच चार खेळाडूंसाठी 61 कोटी, तीन खेळाडूंसाठी 43 कोटी आणि दोन खेळाडूंसाठी 32 कोटी रक्कम असेल.
खेळाडूला रिलीज केल्यास आरटीएम पर्याय वापरता येईल?
सहा खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी आहे. पण फ्रेंचायझीने पाच खेळाडू रिटेन केले. तर एका खेळाडूसाठी आरटीएम वापरता येईल. चार खेळाडू रिटेन केल्या दोन आरटीएम वापरता येतील. तीन खेळाडू रिटेन केल्या तीन आरटीएम वापरता येतील.
आरटीएम म्हणजे नेमकं काय?
आरटीएम म्हणजे राईट टू मॅच पर्याय.. हा खेळाडू घेण्यासाठी खास पर्याय आहे. म्हणजेच एखाद्या खेळाडूवर फ्रेंचायझीचा शिक्का असतो. पण त्याला लिलावात सोडावं लागतं. पण खेळाडूचे रिलीज करण्याचे पूर्ण हक्क फ्रेंचायझीकडे असतात. साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर तिलक वर्माला मुंबई इंडियन्सने आरटीएम पर्याय वापरून सोडलं. त्याला लिलावात आरसीबीने 10 कोटी रुपयात घेतलं. तर मुंबई आरसीबीला 10 कोटी देऊन तिलक वर्माला घेऊ शकते. पण मुंबईने त्याला घेण्यास असमर्थता दाखवली तर मग बोली लावलेल्या संघात त्याला खेळावं लागेल.
फ्रेंचायझींना आयपीएल लिलावासाठी किती रक्कम मिळणार?
आयपीएल फ्रेंचायझींना 120 कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे. यात सहा खेळाडू जर संघाने राखून ठेवले तर त्यातून 79 कोटी रुपये वजा होतील. 41 कोटी प्रत्यक्षात लिलावात वापरता येईल. म्हणजेच रिटेन खेळाडूंसाठी किती रक्कम मोजली यावरून लिलावातील रक्कम ठरणार आहे.