ज्याची भीती होती तेच घडलं, प्रमुख बॉलर टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर

बीसीसीआयनं संध्याकाळी दिलेल्या एका माहितीमुळे अनेकांची निराशा झालीय.

ज्याची भीती होती तेच घडलं, प्रमुख बॉलर टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर
टीम इंडियाImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 9:58 PM

मुंबई : ज्याची भीती होती शेवटी तेच घडलं. बीसीसीआयनं (BCCI) आज अशी बातमी दिली की त्यामुळे आता टीम इंडियाचं  टेन्शन वाढलंय. तर क्रिकेटप्रेमींच्या आशा देखील धुळीस मिळाल्या आहेत. एकीकडे टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जवळ येत असताना टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज संघातून बाहेर गेल्याची माहिती आहे. त्यामुळे बीसीसीआयनं संध्याकाळी दिलेली ही माहिती अनेकांची निराशा करून केली आहे.

बीसीसीआयचं ट्विट

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे अधिकृतपणे T20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला आहे. यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा झाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन करणाऱ्या बुमराहची दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिकेसाठीही निवड झाली होती, मात्र पहिल्या सामन्यात तो तंदुरुस्त नसल्यामुळे तो खेळू शकला नाही.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात सांगितलंय की, बुमराहला आयसीसी पुरुषांच्या टी-20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने सांगितलंय की बुमराह आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही.

BCCI लवकरच T20 विश्वचषकासाठी बुमराहच्या बदलीची घोषणा करणार आहे. 2022 च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडणारा बुमराह हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी अष्टपैलू रवींद्र जडेजा या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.