IND vs WI : विजयी षटकार मारण्यापूर्वी हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्यात काय संवाद झाला? रेकॉर्ड झालेलं संभाषण ऐका..
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. तिसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत कमबॅक केलं आहे. या सामन्यात तिलक वर्माचं अर्धशतक एका धावेनं हुकलं.
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कमबॅक केलं. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी जबरदस्त खेळी केली. या दोन्ही खेळाडूंच्या आक्रमकतेमुळे वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनची दाणादाण उडाली. सूर्यकुमार यादव याने 4 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 83 धावा केल्या. तर तिलक वर्मा याचं अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकलं. त्याचं अर्धशतक हुकल्याने कर्णधार हार्दिक पांड्या सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरला आहे. कारण टीम इंडियाला 2 धावांची आवश्यकता असताना हार्दिक पांड्याने उत्तुंग षटकार ठोकला आणि विषय संपवला. तर तिलक वर्माला नाबाद 49 धावांवर तंबूत परतावं लागलं. त्यामुळे हार्दिक पांड्या स्वार्थी असल्याची टीका आता सोशल मीडियावर होत आहे. पण षटकार मारण्यापूर्वी या दोघांमध्ये काय संभाषण झालं होतं ते समोर आलं आहे.
हार्दिक आणि तिलक यांच्यात काय झालं संभाषण?
मैदानातील माईकमध्ये हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्यातील संभाषण रेकॉर्ड झालं आहे. तिलक वर्माने 32 चेंडूत 44 धावा केल्या होत्या. तर भारताला 23 चेंडूत 12 धावांची आवश्यकता होती. तेव्हा हार्दिक पांड्याने तिलक वर्माला सांगितलं की, “तुला हा सामना संपवायचा आहे. थांबायचं आहे. चेंडूंचा फरक पडत आहे.”
— Nihari Korma (@NihariVsKorma) August 9, 2023
हार्दिक पांड्याने आपले शब्द फिरवले?
हार्दिक पांड्या याच्या म्हणण्यानुसार, तिलक वर्माला विजयी रन्स करायचे होते. पण त्याने त्याचे शब्द ऐनवेळी फिरवले. हार्दिक पांड्याच्या आश्वासनानंतर तिलक वर्मा याने 5 चेंडूत 5 धावा केल्या. हार्दिक पांड्याने याने स्ट्राईक मिळताच एक षटकार ठोकला आणि सामना संपवला.
टी20 मालिकेतील आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात तिलक वर्मा चांगला खेळला आहे. वर्माने दुसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. तसेच अर्धशतक झळकावणारा भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. भारताचा चौथा टी20 सामना 12 ऑगस्टला होणार आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.