आर अश्विन निवृत्तीनंतर काय करणार? रोहित शर्माने पत्रकार परिषदेत केलं सर्वकाही उघड

गाबा कसोटीनंतर आर अश्विनने निवृत्तीची घोषणा करत क्रीडाप्रेमींना धक्का दिला.गाबा कसोटी सामना अश्विनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवट ठरला. त्यामुळे आर अश्विन पुढे काय करणार याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत काय ते सांगून टाकलं.

आर अश्विन निवृत्तीनंतर काय करणार? रोहित शर्माने पत्रकार परिषदेत केलं सर्वकाही उघड
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 1:26 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका रंजक वळणावर आली आहे. तीन कसोटी सामन्यानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. कारण तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघांची मालिकेत आघाडी मिळवण्याची संधी हुकली आहे. असं असताना तिसरा कसोटी सामना संपता संपता आर अश्विनने क्रीडारसिकांना धक्का दिला आहे. कोणाच्या ध्यानीमनी नसताना निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे गाबा कसोटी सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दिचा शेवट ठरला आहे.पण आर अश्विनचा रिटायरमेंटनंतरचा प्लान काय? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. दरम्यान, रोहित शर्मा आणि आर अश्विन एकत्रितपणे पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी पत्रकारांनी क्रीडाप्रेमींच्या मनातला प्रश्न विचारला. रोहित शर्माच्या बोलण्याची शैली सर्वांनाच माहिती आहे. पत्रकारांच्या या प्रश्नावर त्याने मिश्किल उत्तर दिलं आणि एकच हास्यस्फोट झाला. ‘आर अश्विन पुढे पत्रकारही होऊ शकतो.’, असं रोहित शर्मा म्हणाला.

‘आर अश्विन येणाऱ्या एक दोन वर्षात तुमच्यासोबत बसलेला असेल. तेव्हा त्याच्याशी चर्चा होत राहील.’, हे उत्तर ऐकून पत्रकार हसू लागले. रोहित शर्माने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, आर अश्विन टीमसोबत नसेल आणि 19 डिसेंबरला भारतात जाणार आहे. त्यानंतर रोहित शर्माला पुजारा, रहाणे आणि अश्विनच्या वेगवेगळ्या भूमिकांबाबत काय वाटतं असं विचारलं. तेव्हा रोहित शर्मा हसतच म्हणाला की, ‘अरे भावा, फक्त अश्विनने निवृत्तीची घोषणा केली आहे. तुम्ही तर माझा जीव घ्याल. ते दोघे (रहाणे-पुजारा) सक्रिय आहेत आणि कधीही येऊ शकतात.’

रोहित शर्माने पुढे सांगितलं की, अजिंक्य रहाणे मुंबईत राहतो आणि मी त्याला भेटत असतो. पुजारा राजकोटमध्ये राहतो म्हणून त्याची माझी इतकी भेट होत नाही. पण क्रिकेटच्या एखाद्या कार्यक्रमात आम्ही नक्की भेटतो. दुसरीकडे आर अश्विनने निवृत्तीबाबत म्हणाला की, ‘मी जास्त वेळ घेणार नाही. आज माझ्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा दिवस आहे. माझ्यात अजूनही क्रिकेट खेळण्याचा जोश आहे. पण मी आता क्लब स्तरावर याचं प्रदर्शन करेल.’ आर अश्विन आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे.

'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.