मुंबई: भारताचे माजी ऑलराऊंडर आणि हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी काल वयाच्या 60 व्या वर्षात पदार्पण केलं. शास्त्री प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. त्याशिवाय निवृत्तीनंतरही भारतीय क्रिकेटमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रवी शास्त्री हे क्रिकेटमधला (Cricket) एक प्रखर आवाज आहेत. अनेक विषयांवर ते सडेतोड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ते वयाच्या 30 व्या वर्षी प्रोफेशनल क्रिकेटमधून निवृत्त झाले. निवृत्ती नंतर ते कॉमेंट्रीकडे वळले. जवळपास दोन दशकं त्यांनी कॉमेंट्री केली. 2017 मध्ये हेड कोच म्हणून ते भारतीय ड्रेसिंग रुममध्ये (Indian Dressing Room) दाखल झाले. हेड कोच बनण्याआधी सुद्धा टीम इंडियात डायरेक्टर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत होते. 2014 ते 2016 दरम्यान ते टीम इंडियाचे डायरेक्टर होते.
रवी शास्त्री हेड कोच पदावर असताना, भारतीय संघाने अनेक मोठे विजय मिळवले. ऑस्ट्रेलियातील मालिका विजय ही त्यांच्या कोचिंग करीयरमधील मोठी कामगिरी आहे. क्रिकेटच्या इतिहासात कुठल्याही आशियाई संघाने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवलं नव्हतं. ते काम भारतीय संघाने करुन दाखवलं.
2018/19 मध्ये शास्त्री हेड कोच आणि विराट कोहली कर्णधार असताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 2-1 ने नमवून इतिहास रचला होता. भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी आघाडी घेतल्यानंतर भारत आर्मीच्या सदस्यांनी टीम इंडियाचं हॉटेलमध्ये जोरदार वेलकम केलं होतं.
#AUSvIND A little dance from @imVkohli as The Bharat Army give #TeamIndia a special welcome back to the team hotel. #BharatArmy #TeamIndia #IndianCricketTeam #COTI ?? pic.twitter.com/wEHElXDy9H
— The Bharat Army (@thebharatarmy) December 30, 2018
खेळाडूंची बस हॉटेलच्या प्रवेशव्दारावर थांबली. त्यावेळी हेड कोच रवी शास्त्री बसमधून खाली उतरले. त्यावेळी त्यांच्या हातात बिअरची बाटली होती. ते बिअर पीतच हॉटेलच्या आत निघून गेले. रवी शास्त्री यांचा अंदाजच वेगळा होता. त्यावेळी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. रवी शास्त्री हे भारतीय क्रिकेटमधलं एक वेगळचं रसायन आहे. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला. भारताने ही मालिका जिंकली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी घेऊन भारतीय संघ मायदेशी परतला होता.