मुंबई : आयपीएलचा (IPL 2022) चालू हंगाम ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडसाठी (Matthew Wade) निराशाजनक ठरला आहे. त्याने आठ सामन्यांच्या आठ डावात केवळ 114 धावा केल्या. गुरुवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) विरुद्धच्या सामन्यातही त्याची कामगिरी विशेष नव्हती. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वेड पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 13 चेंडूत 16 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर पंचाने वेडला एलबीडब्ल्यू आऊट केले. या निर्णयामुळे तो खूप निराश झाला होता. मॅक्सवेलच्या लेन्थ चेंडूवर वेडला स्वीप मारायचा होता. पण चेंडू थेट पॅडवर गेला. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाहनावर अंपायरने त्याला आऊट दिला. मॅथ्यू वेड यानं या निर्णयावर अपील करून फेरविचार घेतला. रिव्ह्यू पाहिल्यानंतर थर्ड अंपायरनेही त्याला बाद घोषित केले.
निकाल आल्यानंतर मॅथ्यू वेड अधिकच संतापला. तो आधी गोलंदाज ग्लेन मॅक्सवेलशी बोलला आणि त्यानंतर पॅव्हेलियनकडे जाताना वेड विराट कोहलीशी बोलताना दिसला. प्रकरण इथेच संपले नाही. ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्यावर वेडने आपला राग व्यक्त केला आणि हेल्मेट आदळला. मग बॅट खाली आपटली. वेड ड्रेसिंग रुममधील अनेक वस्तूंची तोडफोड करतानाही दिसला. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Wade is NOT happy ? pic.twitter.com/XDDtFVX0HR
— Sushant Mehta (@SushantNMehta) May 19, 2022
वेडला गुजरातने 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले. वेडची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याच्यासाठी गुजरातने सर्वप्रथम बोली लावली होती. त्यानंतर पंजाब किंग्सने 2.20 कोटींची बोली लावली. गुजरातने पुढे जाऊन बोली 2.40 कोटींवर नेली. पंजाबने स्वतःला दूर केले आणि वेड गुजरात संघात सामील झाला. या मोसमातील पहिल्या काही सामन्यांमध्ये त्याला सलामीची संधी देण्यात आली होती, मात्र तेथे तो अपयशी ठरला. त्यानंतर त्याला मधल्या फळीत वगळण्यात आले, पण त्याची बॅट चालली नाही.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने 20 षटकांत 5 बाद 168 धावा केल्या. कर्णधार हार्दिक 47 चेंडूत 62 धावा करून नाबाद राहिला. डेव्हिड मिलरने 34 आणि ऋद्धिमान साहाने 31 धावा केल्या. राशिद खानने सहा चेंडूंत नाबाद १९ धावांची खेळी केली. राहुल तेवतिया दोन आणि शुभमन गिलने एक धावा काढून बाद केले.