Video : ऑलिम्पिक अधिकाऱ्याकडून विराट कोहलीचं कौतुक, तो व्हिडीओ पुन्हा व्हायरल
जगातील दिग्गज खेळाडूंच्या यादीमधील असणारा विराट कोहली जगभर प्रसिद्ध आहे. विराटने आजवर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आता टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे तर वन डे आणि कसोटी क्रिकेट कोहली खेळत आहे. ऑलिम्पिक सुरू असताना विराट कोहलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 संपायला आता अवघे काही तास बाकी राहिले आहेत. 12 ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकचा शेवटचा दिवस असणार आहे. ऑलिम्पिकमध्ये यंदा पदक मिळवण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या खेळाडूंचं आता ऑलिम्पिक 2028 कडे लक्ष लागलं आहे. पुढील वर्षी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचाही समावेश केला जाणार असल्याची माहिती समजत आहे. अशातच सोशल मीडियावर ऑलिम्पिक अधिकाऱ्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झालाा आहे. ज्यामध्ये तो अधिकारी विराट कोहलीचं नाव घेताना दिसत आहे.
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करावा की नाही याबाबत मतदान घेतलं गेलं. यावेळी एका अधिकाऱ्याने विराट कोहलीबद्दल माहिती देताना त्याला सोशल मीडियावर असणाऱ्या फॉलोवर्सविषयी माहित दिली. LA 28 चे स्पोर्ट्स डायरेक्टर निकोलो कॅम्प्रियानी असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. कॅम्प्रियानी यांनीच क्रिकेटचा बादशहा असलेल्या विराट कोहलीचं कौतुक केलं होतं. माझा एक मित्र आहे विराट कोहली त्याला सोशल मीडियावर 340 दशलक्ष फॉलोअर्ससह आहेत. लेब्रॉन जेम्स, टॉम ब्रॅडी आणि टायगर वुड्सच्या एकूण जितके फॉलोअर्स आहेत तेवढे त्याचे फॉलोवर्स असल्याचं निकोलो कॅम्प्रियानी म्हणाला.
आता पुढील ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला आहे. मात्र ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा टी-20 फॉरमॅट असणार आहे. पण विराट कोहली याने आता झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती जाहीर केली आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 मध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे आता क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केला गेला तरी विराट कोहली खेळणार की नाही? याबाबत काही निश्चित नाहीय.
Virat Kohli is the main influence for adding cricket to the Olympics – Niccolo Campriani ( Director of the Olympics)
The Global Superstar @imVkohli pic.twitter.com/312lKLWgjg
— 𝘿𝙞𝙡𝙞𝙥𝙑𝙆18 (@Vk18xCr7) August 11, 2024
दरम्यान, टीम इंडियाचे माजी हेड कोच राहुल द्रविड याने दोघे ऑलिम्पिकमध्ये खेळू शकतात असं म्हटल होतं. मात्र दोघांनीही निवृत्ती घेतली असून आणखी चार वर्षांनी परिस्थिती कशी राहते त्यानंतर सर्व काही स्पष्ट होणार आहे.