मुंबई: IPL ची सुरुवात 2008 मध्ये झाली. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हा आयपीएलमधला पहिला चॅम्पियन संघ आहे. राजस्थानचा संघ त्यावेळी कमकुवत समजला जात होता. राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली जेतेपद मिळवून भल्या-भल्या दिग्गज संघांना धक्का दिला होता. राजस्थानने पहिल्यांदा विजेतेपद मिळवलं, तेव्हा तुम्ही काय करत होता? असा प्रश्न विचारला, तर तुम्हाला कदाचित उत्तर द्यायला थोडा वेळ लागेल. पण राजस्थान रॉयल्सचा विद्यमान कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) त्यावेळी काय करत होता? सहाजिक आहे, संजू सॅमसन त्यावेळी लहान मुलगा होता. पण राजस्थान रॉयल्सने आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं, त्यादिवशीही संजू सॅमसन क्रिकेटच खेळत होता. कालच राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला नमवून आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला.
क्वालिफायर 2 चा सामना जिंकून फायनलमध्ये पोहोचलेला संजू सॅमसन म्हणाला की, “मी त्यावेळी केरळमध्येच कुठेतरी अंडर 16 ची फायनल खेळत होतो. त्यावेळी, मी शेन वॉर्न आणि सोहेल तन्वीर यांना राजस्थान रॉयल्ससाठी फायनल जिंकताना पाहिलं होतं” क्वालिफायर 1 च्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सला क्वालिफायरचा दुसरा सामना जिंकण आवश्यक होतं. राजस्थानने आरामात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर 7 विकेटने विजय मिळवला.
“IPL मध्ये कमबॅक करण्याची आम्हाला सवय आहे. ही एक मोठी स्पर्धा आहे. इथे चढ-उतार सुरुच असतात. पहिल्या इनिंगमध्ये विकेट वेगवान गोलंदाजांना अनुकूल होती. खेळपट्टीमध्ये बाऊन्स आणि फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती. वेगवान गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली” असं संजू सॅमसन म्हणाला.
WHAT. A. WIN for @rajasthanroyals! ? ?
Clinical performance by @IamSanjuSamson & Co. as they beat #RCB by 7⃣ wickets & march into the #TATAIPL 2022 Final. ? ? #RRvRCB
Scorecard ▶️ https://t.co/orwLrIaXo3 pic.twitter.com/Sca47pbmPX
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2022
“स्पर्धा सुरु झाली तेव्हा मला फार अपेक्षा नव्हत्या. पण आज आम्ही फायनलमध्ये पोहोचल्याचा आनंद आहे. स्पर्धेच्या मध्यावर थोडा दबाव होता. पण कोलकात्यामध्ये पोहोचल्यानंतर सर्व सुरळीत झालं. क्रिकेट विश्वातील एका मोठ्या टी 20 लीगची मी फायनल खेळणार आहे, त्याचा मला आनंद आहे. आम्हाला शेन वॉर्नसाठी ही स्पर्धा जिंकायची आहे. जर हे शक्य झालं, तर ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल” असं संजू म्हणाला.