ऑलम्पिक 2024 स्पर्धेचं 33वं पर्व पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. जगभरातील दहा हजाराहून अधिक स्पर्धक भाग घेणार आहेत. भारताच्या दलात 113 स्पर्धक सहभागी आहेत. पॅरिस ऑलम्पिकमध्ये 32 खेळांच्या 329 स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.तीरंदाजी, एथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, इक्वेस्ट्रियन, गोल्फ, हॉकी, शूटिंग, सेलिंग, टेबल टेनिस, टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, स्विमिंग, रोव्हिंग, ज्युडो या खेळात भारतीय खेळाडू सहभागी आहे. भारताकडून नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि निखत जरीन यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा 26 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत आहे. भारतीय वेळेनुसार पॅरिसमधील वेळ ही 3 तास 30 मिनिटं मागे आहेत. ऑलम्पिक स्पर्धा अधिकृतरित्या 26 जुलैपासून सुरु होणार आहे. तर फुटबॉल आणि रग्बी सेवन्सचे सामने 24 जुलैपासून भारतीय वेळेनुसार संध्याकळी 6.30 वाजता सुरु होतील. दुसरीकडे, ऑलम्पिक समारोप कार्यक्रमात बदल होऊ शकतो. भारतीय ऑलम्पिक पथकाचं अभियाना 25 जुलैपासून सुरु होईल. तीरंदाजी फेरीने सुरुवात होईल. तर पहिला पदक कार्यक्रम 27 जुलैला 10 मीट एअर रायफल स्पर्धेपासून होईल.
टोक्यो ऑलम्पिक 2020 स्पर्धेत समितीने कराटे, बेसबॉल आणि सॉफ्टबॉल सहभागी केले होते. पण पॅरिस ऑलम्पिकमध्ये हे खेळ नसतील.ऑलंपिकमध्ये पहिल्यांदाच स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लायम्बिंग, सर्फिंग आणि ब्रेकिंग अपारंपरिक खेळांचा समावेश झाला आहे. ब्रेकिंगला डान्सिंग असं संबोधलं जातं. हा खेळ पहिल्यांदाच खेळला जाणार आहे. पॅरिसमध्ये यापूर्वी दोन ऑलंम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 1900 आणि 1924 मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पॅरिस हा लंडन तिसऱ्यांदा यजमानपद भूषविणार आहे. यापूर्वी टोक्यो ऑलंम्पिकमध्ये भारताच्या झोळीत एकूण 7 पदकं आली होती. या स्पर्धेत भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
भारतीयांना ऑलिम्पिक स्पर्धा स्पोर्ट्स 18 चॅनेलवर पाहता येईल. तसेच जिओ सिनेमा अॅपवर ही स्पर्धा फ्रीमध्ये पाहू शकता. जिओ सिनेमाने ऑलम्पिक 2024 स्पर्धा फ्रीमध्ये दाखवण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त क्रीडारसिक दूरदर्शन्चाय स्पोर्ट्स चॅनेलवर सामने पाहू शकता.