IPL 2022, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत कोणता खेळाडू आघाडीवर? तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल झालेल्या केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात केकेआरने मुंबईवर 52 धावांनी मोठा विजय मिळवला. यानंतर आयपीएलच्या पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया...
मुंबई : दरवर्षी आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. या टेबलमध्ये रोज सामन्यानंतर बदल होत असतो. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल झालेल्या केकेआर (KKR) विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या (MI) सामन्यात केकेआरने मुंबईवर 52 धावांनी मोठा विजय मिळवला. कोलकात्याच्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा डाव 113 धावात आटोपला. त्यामुळे केकेआरच्या धावगतीत सुद्धा सुधारणा झाली आहे. इशान किशनने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. पण त्यात T 20 क्रिकेटला साजेसा वेग नव्हता. त्याने 43 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अवघ्या 2 रन्सवर साउदीने रोहितला जॅक्सनकरवी झेलबाद केलं. तिलक वर्माही फार वेळ टिकला नाही. त्याला अवघ्या 6 रन्सवर रसेलने बाद केलं. मागचे दोन सामने मुंबई इंडियन्सला जिंकून देणारा टिम डेविड चमकला नाही. वरुण चक्रवर्तीच्या फिरकीने त्याला चकवलं. डेविडने 9 चेंडूत 13 धावा केल्या. या खेळीत तीन चौकार होते. पॅट कमिन्सने एकाच ओव्हरमध्ये इशान किशन, डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विन यांच्या विकेट काढल्या. कालच्या केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यानंतर पर्पल कॅपच्या यादीत काय बदल झालाय पाहुया…
पर्पल कॅपचा मानकरी कोण?
पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने सर्वाधिक 22 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्याने 21 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी कागिसो रबाडा आहे. त्याने अठरा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी कुलदीप यादव आहे. त्याने देखील अठरा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. पाचव्या स्थानी टी नटराजन आहे. त्याने सतरा विकेट घेतल्या आहेत.
पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज
गोलंदाज | विकेट | दिलेल्या धावा |
---|---|---|
युझवेंद्र चहल | 26 | 462 |
वानिंदू हसरंगा | 24 | 362 |
कागिसो रबाडा | 23 | 406 |
उमरान मलिक | 22 | 444 |
कुलदीप यादव | 21 | 419 |
कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
केकेआरची टीम सातव्या स्थानावर
KKR ला कालच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यांच्यासाठी हा सामना ‘करो या मरो’ होता. पॉइंटस टेबलमध्ये केकेआरचा संघ नवव्या स्थानावर होता. मुंबई विरुद्धच्या विजयानंतर केकेआरची टीम सातव्या स्थानावर आली आहे. चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सला नमवल्यानंतर केकेआरची नवव्या स्थानावर घसरण झाली होती. प्लेऑफचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी केकेआरला कालच्या सामन्यात विजय आवश्यक होता. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून रहाव लागेल. आता दिल्ली, एसआरएच, पंजाब आणि कोलकाता तिन्ही टीम्सचे समान 10 पॉइंटस आहेत.