IPL 2022, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत कोणता खेळाडू आघाडीवर? तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल लखनौ विरुद्ध गुजरातमध्ये सामना झाला. यानंतर आयपीएलच्या पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया...
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये काल गुजरात (GT) विरुद्ध लखनौ (LSG) सामना झाला. या सामन्यात गुजरातने लखनौला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य दिले होते. पण केएल राहुलच्या (KL Rahul) लखनौचा डाव 82 धावात आटोपला. राशिद खान काल आपल्या नावाला जागला. त्याच्या लेग ब्रेक गोलंदाजीने कमाल केली. चार ओव्हर्समध्ये 24 धावा देत त्याने चार विकेट घेतल्या. राशिद खानने ऑलराऊंडर दीपक हुड्डाला (27), कृणाल पंड्या (5), जेसन होल्डर (1) आणि आवशे खान (12) या विकेट काढल्या. कृणाल पंड्याचा विकेट तर अप्रतिम होता. राशिद खानने आज अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने कृणाला पंड्याला अप्रतिम गुगलीवर खेळण्यासाठी क्रीझ बाहेर आणलं. कृणालची पावलं क्रीझ बाहेर जाताच विकेटकीपर सहाने कुठलीही चूक केली नाही. त्याने लगेच स्टम्पिंग केलं. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया.
पर्पल कॅपचा मानकरी कोण?
पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने सर्वाधिक 22 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्याने 21 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी कागिसो रबाडा आहे. त्याने अठरा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी कुलदीप यादव आहे. त्याने देखील अठरा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. पाचव्या स्थानी टी नटराजन आहे. त्याने सतरा विकेट घेतल्या आहेत.
पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज
गोलंदाज | विकेट | दिलेल्या धावा |
---|---|---|
युझवेंद्र चहल | 26 | 462 |
वानिंदू हसरंगा | 24 | 362 |
कागिसो रबाडा | 23 | 406 |
उमरान मलिक | 22 | 444 |
कुलदीप यादव | 21 | 419 |
कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
राहुल विरुद्ध मोहम्मद शमी जिंकला
काल लखनौची भिस्त प्रामुख्याने कॅप्टन केएल राहुल आणि क्विंटन डि कॉक या जोडीवर होती. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने क्विंटन डि कॉकला 11 धावांवर बाद केलं. त्यानंतर केएल राहुलला 8 धावांवर मोहम्मद शमीने सहाकरवी झेलबाद केलं. लखनौची इनिंग सुरु होण्याआधी ते हे लक्ष्य सहज गाठतील असं वाटलं होतं. पण गुजरातच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. पावरप्ले पूर्ण होण्याआधीच लखनौचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. लखनौकडून फक्त दीपक हुड्डाने सर्वाधिक 27 धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले.