IND vs BAN : भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात कोणते खेळाडू ठरतील वरचढ? जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि प्लेइंग इलेव्हन

World Cup 2023, IND vs BAN : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. पण स्पर्धेतील दोन मोठे उलटफेर पाहिल्यानंतर या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या सामन्यात कोणते खेळाडू वरचढ ठरतील ते जाणून घ्या.

IND vs BAN : भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात कोणते खेळाडू ठरतील वरचढ? जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि प्लेइंग इलेव्हन
IND vs BAN : भारत बांगलादेश सामन्यात हे खेळाडू करतील मालामाल, जाणून घ्या कोणते खेळाडू ठरतील लकी तेImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 7:45 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण गाफिल राहणं महागात पडू शकतं हे देखील तितकंच खरं आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यामुळे विजयीरथ तसाच कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. तर बांगलादेशचा संघ शाकिब अल हसनच्या नेतृत्वात मोठा उलटफेर करण्याचा हेतूने सामना खेळेल. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरेल? इथपासून कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करतील याकडे लक्ष लागून आहे. या सामन्यात बेस्ट कामगिरी करू शकतील अशा 11 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.

पिच रिपोर्ट

पुण्यातील हे मैदान फलंदाजीला पुरक आहे. या मैदानावर आतापर्यंत 7 सामने खेळले गेले आहेत. यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 4 सामने जिंकला आहे. या मैदानावर 300 च्या पार धावसंख्या होऊ शकते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारणं पसंत केलं जाईल.

लकी इलेव्हन

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार ठरू शकतात. पण सामन्यात कधी काय होईल हे देखील सांगता येत नाही. त्यामुळे शाकिब अल हसन, महेदी हसन मिराज, कुलदीप यादव यांच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. तर रवींद्र जडेजा, केएल राहुल, शुबमन गिल हे खेळाडू बजेट ठरू शकतात.

  • विकेटकीपर: केएल राहुल, मुशफिकुर रहीम.
  • बॅटर : शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली.
  • ऑलराउंडर: शाकिब अल हसन, महेदी हसन मिराज, रविंद्र जडेजा.
  • बॉलर: जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शोरिफुल इस्लाम .

दोन्ही संघांचे संभाव्य 11 खेळाडू

भारत संभाव्य प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर/मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

बांगलादेश संभाव्य प्लेइंग 11 : नजमुल हुसैन शान्तो, तौहीद हृदोय, तनजीद हसन, महेदी हसन मिराज, शाकिब अल हसन (कर्णधार), महमूदुल्लाह रियाद, लिटन दास, मुश्फिकुर रहीम (विकेटकीपर), मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम, तस्कीन अहम

'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.