World Test Championship Final 2021 | जागतिक कसोटीचं आव्हान, इंग्लंडच्या वेगवान खेळपट्टीवर भारताकडून सलामीला कोण उतरणार?

टीम इंडियाची (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप (ICC World Test Championship final 2021) आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे.

World Test Championship Final 2021 | जागतिक कसोटीचं आव्हान, इंग्लंडच्या वेगवान खेळपट्टीवर भारताकडून सलामीला कोण उतरणार?
shubaman gill and rohit sharma
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 10:04 PM

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship Final)अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या एकमेव पण महत्वपूर्ण सामन्यासाठी बीसीसीआयने 4 राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18-22 जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये हा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने 2 सलामीवीरांच्या जागेसाठी 3 जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये (Shubhman Gill) शुबमन गिल, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मयंक अगरवाल (Mayank Agarwal) संधी देण्यात आली आहे. तर केएल राहुलला (K L Rahul) संघात स्थान मिळवण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. (Who among the Rohit Sharma Shubman Gill and Mayank Agarwal will open the ICC World Test Championship Final 2021)

शुबमन गिल

शुबमनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातूनल कसोटी पदार्पण केलं. शुबमनने तेव्हापासून 7 सामन्यांमधील 13 डावात 34.36 सरासरी आणि 58.7 च्या स्ट्राईक रेटने 3 अर्धशतकांसह 644 धावा केल्या आहेत. 91 ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याने हे 91 रन्सची खेळी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत केली. त्याच्या या खेळीने विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे शुबननेही सलामीसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे.

रोहित शर्मा

रोहित शर्माने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 161 धावांची दीडशतकी खेळी केली होती. तसेच रोहितने वेळोवेळी या मालिकेत छोटेखानी पण महत्वपूर्ण खेळी केली. रोहित अनुभवी आहे. त्याच्याकडे नेतृत्वाचा अनुभव आहे. रोहितकडे नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत संघाची जबाबदारी सांभाळण्याचे कौशल्य आहे.

मयंक अग्रवाल

मयंकने 14 कसोटीतील 23 डावात 45.74 सरासरी आणि 54.48 च्या स्ट्राईक रेटने 3 शतक आणि 2 द्विशतकांसह 1 हजार 52 धावा केल्या आहेत. मयंकने अवघ्या 14 सामन्यांमध्ये द्विशतक झळकावले आहेत. मात्र त्याला आपल्या खेळीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे मयंकला अनेकदा संघातून बाहेर पडावे लागले. पण यावेळेस त्याला संधी मिळाली आहे. यामुळे मयंक प्लेइंग इलेव्हनमध्ये ओपनर म्हणून स्थान बनवण्यात यशस्वी ठरणार का, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

टीम इंडियाचा सलामीवीर आणि पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल. काही दिवसांपूर्वी केएलच्या पोटात वेदना सुरु झाल्या होत्या. प्राथमिक वैद्यकीय उपचार करुनही वेदना थांबत नव्हत्या. यानंतर तातडीनं पुढील तपासणी केली असता त्याला अ‌ॅपेंडिक्स असल्याचं समोर आलं. सुरक्षेच्या दृष्टीनं केल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे केएलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी फिटनेस टेस्ट बंधनकारक असणार आहे.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. तर केएल राहुल आणि वृद्धिमान साहा या दोघांना त्यांच्या प्रकृतीत सुधार झाल्यास संधी मिळेल.

संबंधित बातम्या :

World Test Championship Final 2021 | रवींद्र जाडेजा ते अक्षर पटेल फिरकीच्या जोडीला बुमराह-ईशांतचं वेगवान अस्त्र, भारताचा गोलंदाजांचा ताफा कसा?

ICC World Test Championship Final | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

(Who among the Rohit Sharma Shubman Gill and Mayank Agarwal will open the ICC World Test Championship Final 2021)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.