Who Is Lalit Yadav: ललित यादवमुळे पुन्हा मुंबईची पहिली मॅच ‘देवाला’, त्याने 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याची किमया दोनदा केलीय
ललित यादव (Lalit Yadav) आणि अक्षर पटेल (Axar patel) यांच्या जबरदस्त खेळाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2022 मध्ये विजयी सुरुवात केली. खरंतर या सामन्यात एक वेळ अशी होती की, मुंबई इंडियन्स हा सामना सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हा सामना चार विकेटने गमावला.
मुंबई: ललित यादव (Lalit Yadav) आणि अक्षर पटेल (Axar patel) यांच्या जबरदस्त खेळाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2022 मध्ये विजयी सुरुवात केली. खरंतर या सामन्यात एक वेळ अशी होती की, मुंबई इंडियन्स हा सामना सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हा सामना चार विकेटने गमावला. ललित यादव आणि अक्षर पटेलने सातव्या विकेटसाठी 30 चेंडूत नाबाद 75 धावांची भागीदारी केली. ललित यादव नाबाद (48) आणि अक्षर पटेलने नाबाद (38) धावा केल्या. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या होत्या. एकवेळ दिल्लीची अवस्था 6 बाद 104 अशी होती. पण अखेरीस त्यांनी 10 चेंडू राखून विजय मिळवला. आयपीएलमध्ये सलामीचा सामना न जिंकण्याचा सिलसिला मुंबईने कायम राखला आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रविवारी डबल हेडर सामने खेळवण्यात आले. दिवसातील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. 178 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ एकवेळ मागे पडला होता. पण ललित यादव आणि अक्षर पटेलच्या दमदार खेळीने संघाला विजय मिळवून दिला.
65 लाखात ललित यादव दिल्ल्याच्या ताफ्यात
अक्षर पटेलसह दिल्ली कॅपिटल्सच्या ललित यादवने सामन्याचं पूर्ण चित्र बदललं. ललितने 38 चेंडूत 48 धावा केल्या. यादरम्यान ललितने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. ललित-अक्षरच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने शेवटच्या 30 चेंडूत 75 धावा जोडल्या. 25 वर्षीय ललित यादव दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो, तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही दिल्लीचा खेळाडू आहे. आयपीएल 2022 च्या महा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने ललित यादवला 65 लाख रुपयांमध्ये घेतलं होतं.
दोन वेळा 6 चेंडूत 6 षटकार
ललित यादवने आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ 8 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला केवळ 116 धावाच करता आल्या आहेत. रविवारी मुंबईविरुद्धची 48 धावांची खेळी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे. ललित यादवच्या नावावर एक खास रेकॉर्डही आहे. त्याने 6 चेंडूत 6 षटकार लगावण्याचा पराक्रम एकदा नव्हे तर दोनदा केला आहे. ललित यादवने दिल्लीतच दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळताना हा पराक्रम केला आहे. येथे खेळवण्यात आलेल्या एका डावात त्याने 46 चेंडूत 130 धावा केल्या होत्या.
2017 मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण
ललित यादवने 2017 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हा त्याने महाराष्ट्राविरुद्ध 52 धावांची खेळी साकरालली होती. ललित यादवने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिल्या चार डावांपैकी तीन डावात अर्धशतकं लगावली होती. आयपीएल 2022 च्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने दणदणीत विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्सचा या मोसमातील पहिला सामना ते पुन्हा एकदा हरले आहे.
The spirit. The fight ?
What a knock, @LalitYadav03 ?#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #DCvMI#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/JOKx9fWnAD
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 27, 2022
इतर बातम्या
IPL 2022 Mumbai Indians Jasprit Bumrah ला काय झालय? इतकी वाईट बॉलिंग त्याने कशी केली?
Rohit Sharma Fined, IPL 2022: Mumbai Indians ला दुहेरी फटका, रोहितला भरावा लागला 12 लाखाचा दंड