T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत ‘प्लेअर ऑफ टुर्नामेंट’ पुरस्कार विजेता खेळाडू कोण? उत्तर माहितीय?
Cricket Question in Government Job Exam: सरकारी नोकरीच्या परीक्षेत टी 20 वर्ल्ड कप 2024 संदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अवघ्या काही महिन्यांपूर्वी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा पार पडली. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात या स्पर्धेत इतिहास रचला. टीम इंडियाने 17 वर्षांनी रोहितच्या कर्णधारपदात टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. टीम इंडियाने सलग सर्व सामने जिंकत वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली. टीम इंडियाने महाअंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताला 11 वर्षांनी आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली. त्यानंतर टीम इंडियाचं भारतात जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच मुंबईत विजयी मिरवणुकीही काढण्यात आली. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या अनुभवी त्रिकुटाने टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूंचं सोशल मीडियावर आभार माननाऱ्या अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. आता त्याच सोशल मीडियावर टी 20 वर्ल्ड कप संदर्भात एक फोटो व्हायरल झाला आहे.
व्हायरल फोटोनुसार, ओडिसा सरकारच्या एका परीक्षेत टी 20 वर्ल्ड कप 2024 संदर्भात एक प्रश्न करण्यात आला आहे. या प्रश्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘नुकत्याच पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार कुणाला देण्यात आला?’, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला 4 पर्याय देण्यात आलेत. सूर्यकुमार यादव, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव असे 4 पर्याय आहेत. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या प्रश्नाचं उत्तर देण्याचं प्रयत्न केले. पण तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहितीय का? आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात.
व्हायरल प्रश्नाचं उत्तर काय?
A question about the T20 World Cup asked on India post (MTS exam), Odisha Circle. pic.twitter.com/mPdiU4rOIb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 3, 2024
तुम्हाला उत्तर माहितीय?
टीम इंडियाचा यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह याला टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत ‘प्लेअर ऑफ टुर्नामेंट’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. बुमराहने 8 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहने 4.17 च्या इकॉनॉमीने ही कामगिरी केली होती. बुमराहच्या या कामगिरीची दखल त्याला या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.