RR vs DC IPL 2021 Match Prediction | दोन विकेटकीपर कर्णधारांमध्ये कडवी झुंज, राजस्थान विरुद्ध दिल्ली आमनेसामने, कोण जिंकणार सामना?
आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 7 वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
मुंबई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 7 वा सामना आज (15 मार्च) खेळवण्यात येणार आहे. ही मॅच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ही सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडणार आहे. उभयसंघांनी या मोसमातील पहिला सामना खेळला आहे. दिल्लीने विजयी सुरुवात केली आहे. तर राजस्थानला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या मॅचमध्ये दिल्ली सलग दुसरा विजय मिळवणार की राजस्थान विजयाचं खातं उघडणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. (who wil win rajasthan royals vs delhi capitals ipl match prediction previous match stats in marathi)
???? time. ?#RRvDC | #HallaBol | #RoyalsFamily | @IamSanjuSamson pic.twitter.com/Gl2U3OSpdU
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 15, 2021
दोन्ही संघ तुल्यबळ
आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 22 वेळा आमनेसामने भिडले आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही टीमने प्रत्येकी 11 सामने जिंकले आहेत. यामुळे हा सामना नक्की कोण जिंकणार, याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
दोन्ही युवा कर्णधारांमध्ये कडवी झुंज
या सामन्यामध्ये दोन्ही कर्णधारांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. दिल्लीच्या नेतृत्वाची जबाबदारी रिषभ पंतच्या खांद्यावर आहे. तर राजस्थानच्या कर्णधारपदाची धुरा संजू सॅमसनकडे आहे. कर्णधार म्हणून या दोन्ही खेळाडूंचा हा पहिलाच मोसम आहे. तसेच हे दोन्ही खेळाडू आपल्या टीमसाठी विकेटकीपिंग करतात. सोबतच हे दोघे आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. त्यामुळे या सामन्यात या दोन्ही कर्णधारांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
संजू सॅमसनने सलामीच्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 119 धावांची शतकी खेळी केली होती. संजू पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा पहिलाच कर्णधार ठरला. मात्र त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. तर रिषभने सलामीच्या सामन्यात चेन्नई विरुद्ध नाबाद 15 धावा केल्या होत्या. यामुळे आजच्या सामन्यात कोण वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अशी आहे दिल्लीची टीम
रिषभ पंत (कर्णधार) खगिसो रबाडा, मार्कस स्टोइनिस, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, ख्रिस वोक्स, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, प्रवीण दुबे, प्रथ्वी शॉ, ललित यादव, एनरिक नॉर्किया, आवेश खान, अक्षर पटेल, अमित मिश्रा, टॉम करन, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमान मेरीवाला, एम सिद्धार्थ आणि सॅम बिलिंग्स.
राजस्थानची टीम
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, एंड्रयू टाई, कार्तिक त्यागी, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, महिपाल लोमरोर, डेव्हिड मिलर, जोस बटलर, मनन वोहरा, रियान पराग, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्ताफिजुर रहमान, चेतन साकारिया, केसी करियप्पा, लियाम लिविंगस्टोन, कुलदीप यादव आणि आकाश सिंह.
संबंधित बातम्या :
PHOTO | IPL 2021 RR vs DC Head to Head Records | श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत आमनेसामने, पाहा राजस्थान आणि दिल्लीची आकडेवारी
VIDEO | विकेट गेल्यावर बॅटने खुर्ची उडवली, विराट कोहलीवर नियमभंगाचा ठपका
(who wil win rajasthan royals vs delhi capitals ipl match prediction previous match stats in marathi)