RCB vs RR, IPL 2021 Match Prediction | दोन रॉयल संघ आमनेसामने, विराट कोहली विजयी घोडदौड कायम ठेवणार की संजू सॅमसन बाजी मारणार?

आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 16 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (royal challengers banglore) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात लढत रंगणार आहे.

RCB vs RR, IPL 2021 Match Prediction | दोन रॉयल संघ आमनेसामने, विराट कोहली विजयी घोडदौड कायम ठेवणार की संजू सॅमसन बाजी  मारणार?
आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 16 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (royal challengers banglore) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात लढत रंगणार आहे.
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 5:04 PM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 16 वा सामना आज (22 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात ही लढत रंगणार आहे. या सामन्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. बंगळुरु या सामन्यात विजय मिळवून विजयी घोडदौड कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. तर राजस्थानसमोर बंगळुरुचे मजबूत आव्हान असणार आहे. (who will win rcb vs rr ipl today match royal challengers banglore vs rajasthan royals prediction previous match stats 22 april in marathi)

मोसमात पहिल्यांदाच आमनेसामने

आयपीएलच्या 14 व्या हंगामात उभयसंघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. उभयसंघ आतापर्यंत या पर्वात प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत. बंगळुरुने या तिनही सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानला 1 सामन्यात विजय तर उर्वरित 2 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पॉइंट्सटेबलमध्ये बंगळुरु 6 पॉइंट्ससह दुसऱ्या तर राजस्थान 2 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे.

आकडेवारी कोणाच्या बाजूने?

आयपीएलच्या इतिहासात बंगळुरु आणि राजस्थान आतापर्यंत एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. आकडेवारीनुसार दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. बंगळुरु आणि राजस्थानने प्रत्येकी 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर उर्वरित 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.

बंगळुरु राजस्थानवर वरचढ

बंगळुरु कामिगरीच्या बाबतीत राजस्थान वरचढ आहे. या मोसमात बंगळुरु शानदार कामगिरी करतेय. बंगळुरुची टॉप ते मीडल ऑर्डर दमदार कामगिरी करत आहेत. मॅक्सवेल आणि एबी डीव्हीलियर्स सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. तर राजस्थान पूर्णपणे 2-3 खेळाडूंवर अवलंबून आहे. त्यात लियाम लिविंगस्टोन इंग्लंडला परतल्याने राजस्थानची बाजू कमजोर झाली आहे. तसेच राजस्थानच्या बॅटिंगची जबाबदारी ही पूर्णपणे कर्णधार संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे.

विराटला विजयी चौकाराची संधी

एकूणच सर्व बाबतीत दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पण या मोसमातील बंगळुरुची शानदार फॉर्मात आहेत. त्यामुळे विराटसेना राजस्थान वरचढ ठरत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विराटसेना विजयाचा चौकार लगावणार, की राजस्थान बंगळुरुला रोखणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अशी आहे विराटसेना

विराट कोहली (कर्णधार) , मोहम्‍मद सिराज, जोश फिलिप, एबी डिव्हीलियर्स (विकेटकीपर) , डॅनियल सॅम्‍स, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, देवदत्‍त पडिक्‍कल, पवन देशपांडे, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, अॅडम झॅम्पा, केन रिचर्डसन, कायले जॅमिसन, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्टियन, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, केएस भरत आणि सुयश प्रभुदेसाई,

राजस्थानची टीम

संजू सॅमसन (कर्णधार&विकेटकीपर), यशस्‍वी जयस्वाल, अनुज रावत, एंड्रयू टाई, कार्तिक त्‍यागी, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, महिपाल लोमरोर, डेव्हिड मिलर, जोस बटलर, मनन वोहरा, रियान पराग, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्‍ताफिजुर रहमान, चेतन सकारिया, केसी करियप्‍पा, लियाम लिविंगस्‍टोन, कुलदीप यादव आणि आकाश सिंह.

संबंधित बातम्या :

IPL 2021, RCB vs RR Head to Head Records | बंगळुरु विरुद्ध राजस्थान आमनेसामने, 2 खेळाडू आणि उभयसंघांची 23 सामन्यांमधील कामगिरी, कोण ठरणार वरचढ?

IPL 2021 : VIDEO वाईडच्या आशेने बॉल सोडला, चेंडू थेट स्टम्प्समध्ये घुसला

(who will win rcb vs rr ipl today match royal challengers banglore vs rajasthan royals prediction previous match stats 22 april in marathi)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.