RCB vs UPW, WPL 2023 Match Prediction | आरसीबी विरुद्ध यूपी आमनेसामने, कोण जिंकणार?
Royal Challengers Bangalore vs Up warriorz Preview : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील 3 सामन्यात सलग पराभव झाला आहे.
मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील 8 वा सामना हा आज (10 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वूमन्स विरुद्ध यूपी वॉरियर्ज यांच्यात मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. स्मृती मंधाना आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. तर एलिसा हीली हीच्याकडे यूपीचं कर्णधारपद आहे. आरसीबीचा हा सामना जिंकून विजयी खातं उघडण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर यूपी वॉरियर्जचा आरसीबीवर मात करत दुसरा विजय मिळवण्याचा मानस असेल.
आरसीबीची बिकट अवस्था
आरसीबीने या स्पर्धेत सलग 3 सामने गमावले आहेत. आरसीबीला अनुक्रमे दिल्ली, मुंबई आणि त्यानंतर गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे स्मृती मंधाना हीच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आरसीबी विरुद्ध यूपी आमनेसामने
It's Match No. 8⃣ of the #TATAWPL! ? ?
The @mandhana_smriti-led @RCBTweets square off against the @UPWarriorz, led by @ahealy77 ? ? #RCBvUPW
Which team are you rooting for❔ pic.twitter.com/FhexeBR5ek
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 10, 2023
तर दुसऱ्या बाजूला यूपीने पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला.तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीकडून 42 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
यूपीच्या फलंदाजांकडे लक्ष
यूपीकडून कॅप्टन एलीसा हीली, किरन नवगिरे, ग्रेस हॅरीस आणि ताहीला मॅक्रगा या फलंदाज शानदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे या चौकडीला रोखण्याचं आव्हान आरसीबीकडे असणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला आरसीबीचे फलंदाज तिन्ही सामन्यात सपशेल अपयशी ठरलेत. आरसीबीच्या फलंदाजांना या सामन्यांमध्ये चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना या आकड्यांचं मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही. आरसीबीकडून 8 मार्च रोजी गुजरात विरुद्ध सोफी डिव्हाईन हीने 66 धावांची खेळी केली. सोफी या स्पर्धेत आरसीबीकडून अर्धशतक ठोकणारी एकमेव फलंदाज ठरली. यावरुन आरसीबीच्या बॅटिंगचा अंदाज बांधता येतोय.
तसेच आरसीबीच्या गोलंदाजांनीही खोऱ्याने धावा लुटवल्या आहेत. त्यामुळे आरसीबीच्या गोलंदाजांनाही बॉलिंगमध्ये बदल करावा, अशी मागणी होत आहे.
टीम आरसीबी | स्मृति मंधाना (कर्णधार), दिशा कसट, ऋचा घोष, इंदिरा रॉय, एलिस पेरी, सोफी डिवाइन, हेदर नाइट, एरिन बर्न्स, डाने वेन निकर्क, श्रेयंका पाटील, पूनम खेमनर, आशा शोबाना, कनिका अहूजा, रेणुका सिंह ठाकूर, प्रीति बोस, कोमल जैनजद, सहाना पवार आणि मेगन सुचित.
यूपी वॉरियर्स | एलिसा हीली (कर्णधार), दीप्ति शर्मा, सोफी एकलेस्टन, ताहिला मॅक्ग्रा, देविका वैद्य, शबनम इस्माइल, ग्रेस हॅरिस, अंजली शर्वनी, राजेश्वरी गायकवाड, श्वेता सहरावत, किरन नवगिरा, लॉरेन बेल, पार्शवी चोपडा, एस यशसरी, लक्ष्मी यादव आणि सिमरन शेख.