30 हजारांची पेन्शन मिळणाऱ्या विनोद कांबळीनी ‘त्या’ उद्योजकाची लाखो रुपयांची नोकरी का नाकारली? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

सध्या विनोद कांबळी अनेक आजारांचा सामना करत आहे, त्याला बीसीसीआयच्या पेन्शन व्यतिरीक्त दुसरं कोणतंही उत्पन्नाचं साधन नाहीये, अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

30 हजारांची पेन्शन मिळणाऱ्या विनोद कांबळीनी 'त्या' उद्योजकाची लाखो रुपयांची नोकरी का नाकारली? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 7:55 PM

विनोद कांबळी हा एकेकाळी टीम इंडियाचा टॉप फलंदाजांपैकी एक होता. त्याला जेवढी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली, त्यामध्ये त्याने असे अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. जे आज सचिन तेंडुलकराला सुद्धा मोडता आलेले नाहीत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 1000 धावा करण्याचा विक्रम आजही कांबळीच्या नावावर आहे. मात्र त्यानंतर काही कारणामुळे तो क्रिकेटपासून दुरावत गेला आणि त्याला भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं लागलं.

सध्या कांबळी अनेक आजारांचा सामना करत आहे, त्याला बीसीसीआयच्या पेन्शन व्यतिरीक्त दुसरं कोणतंही उत्पन्नाचं दुसरं साधन नाहीये. पूर्वी 12 ते 13  कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असलेला कांबळी आता बीसीआयकडून मिळणाऱ्या 30 हजार रुपये पेश्नवर आपलं घर चालवत आहे. त्यातच त्याचे पैसे उपचारावर खर्च होत असल्यानं तो मोठ्या आर्थिक संकटात आहे.

दरम्यान तीन वर्षांपूर्वी विनोद कांबळीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होती, की मला नोकरीची आवश्यकता आहे. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शन व्यतिरीक्त माझ्याकडे उत्पन्नाचं दुसरं कोणतचं साधन नाहीये. विनोद कांबळीची ही मुलाखत वाचून एक उद्योजक त्याच्या मदतीसाठी पुढे आला होता, त्याने विनोद कांबळीला एक लाख रुपये प्रती महिना नोकरीची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर विनोद कांबळीनी नाकारली. ही ऑफर नाकारण्या मागचं कारण सांगताना कांबळी म्हणाला की ही नोकरी क्रिकेटशी संबंधीत नाहीये. संदीप थोरात असं कांबळीला एक लाख रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर देणाऱ्या उद्योजकांचं नाव आहे. मात्र विनोद कांबळीने त्यांची ही ऑफर नाकारली.

एका कार्यक्रमामधील सचीन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. ज्यामध्ये तिथे बसलेल्या कांबळी जवळ सचिन तेंडुलकर आला. कांबळीला त्याला भेटायचं होतं. मात्र त्याला उभाही राहाता येत नव्हतं. तसेच त्याने याच कार्यक्रमात आपले गुरु रमाकांत आचरेकर सर यांच्या आठवणीत एक गाणं म्हटलं मात्र हे गाण गाताना देखील त्याचे शब्द अडखळत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.