Sara Tendulkar : सचिनच्या लेकाचं पदार्पण लांबलं, लेकीची मात्र धमाल, सारा तेंडुलकर का आली चर्चेत?

कालच्या सामन्यात सचिनच्या लेकाचं पदार्पण लांबलं. लेक मात्र धमाल करताना दिसून आली.

Sara Tendulkar : सचिनच्या लेकाचं पदार्पण लांबलं, लेकीची मात्र धमाल, सारा तेंडुलकर का आली चर्चेत?
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा Image Credit source: aaj tak
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 8:43 AM

मुंबई : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulakr)मुलगा अर्जुन तेंडुलकरनं (Arjun Tendulkar) आयपीएलचा (IPL 2022) संपूर्ण पंधरावा सीजन सीटवर बसून घालवला. कालच्या सामन्यात तरी त्याला संधी मिळेल असं वाटलं होतं. पण तसं कही झालं नाही. मात्र, सचिनच्या लेकीनं चांगलीच धम्माल केली. सारा तेंडुलकरनं नेमकं काय केलं. ते जाणून घ्याच. मात्र, त्याआधी कालच्या सामन्याविषयी जाणून घ्या. काल मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना झाला. या एका महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) वर विजय मिळवला. मुंबईने दिल्लीवर पाच विकेट राखून विजय मिळवला. सामन्यात रमणदीप सिंहने चौकार ठोकून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबई इंडियन्सच्या कालच्या विजयाचा नायक पुन्हा एकदा टिम डेविड आहे. टिम डेविडने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला हा विजय मिळवता आला. टिम डेविडने 11 चेंडूत 34 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि चार षटकार होते. मुंबईच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झालाय. दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. दिल्लीने विजयासाठी 160 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मुंबईने 19.1 षटकात हे लक्ष्य पार केलं. सामना रोमांचक स्थिती मध्ये असताना टिम डेविड आला. त्याने फटकेबाजी केली व सर्व गणितचं बदलून टाकलं. कालच्या सामन्यात सचिनच्या लेकाचा डेब्यू राहिलाच. मात्र, सचिनच्या लेकीनं चांगलीच धमाल केली.

सचिनच्या लेकीची धमाल

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं आयपीएलचा संपूर्ण पंधरावा सीजन सीटवर बसून घालवला. कालच्या सामन्यात तरी त्याला संधी मिळेल असं वाटलं होतं. पण तसं कही झालं नाही. मात्र, सचिनच्या लेकीनं चांगलीच धम्माल केली. वानखेडे स्टेडियमवर पोहोचण्यापूर्वी सारा तेंडुलकरनं इंस्टाग्रामवर दोन स्टोरीज पोस्ट केल्या. त्यानंतर ती मुंबई इंडियन्सचा विजय जसंजसा जवळ येत गेला तशीच सारानंही धम्माल केली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काल चांगलाच चर्चेत होता. एकीकडे भावाच्या डेब्यूचं दुख्ख तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या विजयाचा आनंद साराच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

हे सुद्धा वाचा

सचिनच्या लेकाचा डेब्यू कधी?

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. आयपीएल 2021 नंतर आयपीएल 2022 मध्ये अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळायला मिळालेला नाही. अर्जुन तेंडुलकर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नक्कीच खेळेल, असं बोललं जात होतं. कारण, रोहित शर्माने मागच्या सामन्यात नवीन खेळाडूंना आजमावणार असल्याचं बोललं होतं. पण हे होऊ शकलं नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.