Video : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? सूर्यकुमार यादवने दिलं असं उत्तर

पाकिस्तानात यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवर खेळवण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, दक्षिण अफ्रिकेत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

Video : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? सूर्यकुमार यादवने दिलं असं उत्तर
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 5:02 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा आता आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र प्रस्ताविक वेळापत्रकाव्यतिरिक्त काहीच घडामोडी घडताना दिसत नाहीत. कारण भारतीय संघ पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार की नाही हा प्रश्न होता. पण आता भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून तिखट प्रतिक्रिया येत आहेत. त्यात आयसीसीने या स्पर्धेबाबतची बैठक न करताच गुंडाळली. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर होणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पण टीम इंडियाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर हायब्रिड मॉडेलशिवाय पर्याय नाही. भारतीय संघाचे सामने युएई किंवा श्रीलंकेत आयोजित करण्याची मागणी होत आहे. पण भारताच्या भूमिकेमुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. त्यामुळे बीसीसीआयवर पाकिस्तानातून टीकेचा भडिमार होत आहे. असं असताना भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. मात्र येथेही भारतीय खेळाडूंवर चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत प्रश्नांचा भडिमार होत आहे. पाकिस्तानच्या चाहत्याने दक्षिण अफ्रिकेत कर्णधार सूर्यकुमार यादवची भेट घेतली आणि प्रश्न विचारला.

पाकिस्तानी चाहत्यांनी सर्वप्रथम सूर्यकुमार यादवसोबत फोटो काढले. त्यानंतर एका चाहत्याने विचारलं की तुम्ही पाकिस्तान खेळण्यासाठी का येत नाहीत? तेव्हा सूर्यकुमार यादव म्हणाला की, आमच्या हातात काहीच नाही. सूर्यकुमार यादवचा हा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूर्यकुमार यादवने अप्रत्यक्षरित्या या उत्तरातून चेंडू बीसीसीआय आणि केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रस्ताविक वेळापत्रकानुसार 19 फेब्रुवारी ते 9 मार्चपर्यंत ही स्पर्धा असणार आहे. या वेळापत्रकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 मार्चला सामना होईल. या स्पर्धेत एकूण 15 सामने होणार असून लाहोर, कराची आणि रावलपिंडीत हे सामने होतील.

भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. चार सामन्यांची टी20 मालिका असून यापैकी दोन सामने पार पडले आहेत. त्यात एक सामना भारताने, तर एक सामना दक्षिण अफ्रिकेने जिंकला आहे. मालिका जिंकण्यासाठी दो्न्ही संघांना उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. अन्यथा ही मालिका बरोबरीत सुटेल. तिसरा सामना सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कवर होणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.