WI vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी वेस्ट इंडिज टीम जाहीर
West Indies vs England Odi Series | इंग्लंड क्रिकेट टीम आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड वनडे, टी 20 आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे.
एटिंग्वा | वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने सलग 2 वर्ल्ड कप जिंकले. विंडिजने 1975 आणि 1979 साली वर्ल्ड कप जिंकला होता. या 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणारी टीम 2023 च्या विश्व चषकासाठी क्वालिफाय करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे विंडिजसह क्रिकेट चाहत्यांची नाराजी झाली. वर्ल्ड कप इतिहासात विंडिजची ही वर्ल्ड कप न खेळण्याची पहिलीच वेळ ठरली. विंडिजचं 2027 च्या वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करण्याचं ध्येय असणार आहेत. विंडिजने 2027 वर्ल्ड कपच्या हिशोबाने वाटचाल सुरु केली आहे.
वेस्ट इंडिज टीम आता इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. इंग्लंड विंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड वनडे, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी वेस्ट इंडिजने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आयसीसीने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. इंग्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत शाई होप हा विंडिजचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर अल्झारी जोसेफ याला उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
या दोघांना डच्चू
वेस्ट इंडिज निवड समितीने इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी 2 अनुभवी खेळाडूंना संधी दिलेली नाही. विस्फोटक फलंदाज निकोल पूरन आणि ऑलराउंडर जेसन होल्डर या दोघांना संधी देण्यात आलेली नाही. आयीसीसी टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन हे जून 2024 मध्ये करण्यात आलं आहे. या टी 20 वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी या दोघांना स्थान देण्यात आलेलं नाही. या दोघांना संधी न मिळाल्याने शेरफेन रुदरफोर्ड आणि मॅथ्यू फोर्ड या दोघांना संधी मिळाली आहे.
विंडिज टीम जाहीर
Some surprise selections by the West Indies among their 15-player squad for next month’s ODI series against England 👀https://t.co/L3NXyav63B
— ICC (@ICC) November 21, 2023
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, रविवार 3 डिसेंबर, एटिंग्वा.
दुसरा सामना, बुधवार 6 डिसेंबर, एटिंग्वा.
तिसरा सामना, शनिवार 9 डिसेंबर, बार्बाडोस.
इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम वेस्ट इंडिज | शाई होप (कॅप्टन), अल्झारी जोसेफ, (उपकर्णधार), एलिक अथानाजे, यानिक कारिया, कीसी कार्टी, शेन डाऊरिच, मॅथ्यू फोर्ड, रोस्टन चेज, शिमरॉन हेटमायर, गुडाकेश मोती, केजॉर्न ओटले, रोमारियो शेफर्ड, शेरफेन रुदरफोर्ड आणि ओशाने थॉमस.