WI vs IND 1st T20I | पहिल्या सामन्यातून सूर्यकुमार यादव याचा पत्ता कट? अशी असेल Playing 11
West Indies vs India 1st Odi | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात पहिला टी 20 सामना हा 3 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे.
त्रिनिदाद | कसोटी आणि वनडे मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध आता टी 20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकूण 5 सामन्यांची टी 20 मालिका असणार आहे. या सारिजला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. हार्दिक पंड्या टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन जवळपास निश्चित झाली आहे. टीम इंडियाचे 11 खेळाडू कोण आहेत, हे आपण पाहणार आहोत.
विंडिज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ईशान किशन आणि शुबमन गिल हे दोघे ओपनिंग करु शकतात. या दोघांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रेकॉर्ड पार्टनरशीप केली. त्यामुळे या दोघांकडे सलामीची जबाबदारी असू शकते. तिसऱ्या स्थानी यशस्वी जयस्वाल येऊ शकतोय.
मिडल ऑर्डरमध्ये तिलक वर्मा चौथ्या आणि संजू सॅमसन पाचव्या स्थानी खेळू शकतो. त्यामुळे सूर्यकुमार यादव याला दुसऱ्या सामन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागू शकते.
सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या असेल. हार्दिक पंड्या कॅप्टन्सीसह बॉलिंग आणि बॅटिंगची जबाबदारी सांभाळणार आहे. तर सातव्या क्रमांकावर अक्षर पटेल असू शकतो.
फिरकीची जबाबदारी ही अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्याकडे असेल. तर युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई यांना वेटिंग करावी लागू शकते.
तसेच वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंह, आवेश खान मुकेश कुमार या तिघांवर असेल. तर उमरान मलिक यालाही बेंचवर बसावं लागणार आहे. मात्र अजून याबाबत कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐनवेळी कोणतेही बदल केले जाऊ शकता.
टी 20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट टीम
रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया
हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.