WI vs IND 1st T20I | टीम इंडियाची हारकीरी, वेस्ट इंडिजचा 4 धावांनी विजय
West Indies vs India 1st T20I | वेस्ट इंडिजने टीम इंडियाला विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला ते आव्हान पार करता आलं नाही.
त्रिनिदाद | वेस्ट इंडिजने टीम इंडियावर पहिल्या टी 20 सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने टीम इंडियाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाचे फलंदाज विंडिजच्या माऱ्यासमोर सपशेल अपयशी ठरले. टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 145 धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
टीम इंडियाकडून डेब्यूटंट तिलक वर्मा याने सर्वाधिक 39 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 21 धावांच योगदान दिलं. कॅप्टन हार्दिक पंड्या निर्णायक क्षणी 19 रन्स करुन माघारी परतला. अक्षर पटेल याने 13, तर संजू सॅमसन याने 12 धावा केल्या. अर्शदीप सिंह 12 धावांवर रन आऊट झाला. या सहा जणांशिवाय इतर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सलामी जोडी सपेशल फ्लॉप ठरली. इशान किशन 6 आणि शुबमन गिल याने 3 धावा करुन मैदानाहबाहेरचा रस्ता धरला. कुलदीप यादव 3 रन्स केल्या. तर युजवेंद्र चहल आणि मुकेश कुमार दोघेही 1 धावेवर नाबाद राहिले, मात्र त्यांना विजय मिळवून देता आलं नाही.
विंडिजकडून रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर आणि ओबेड मॅकॉय या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
दरम्यान त्याआधी विंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ब्रँडन किंग आणि कायले मेयर्स या सलामी जोडीने 29 धावांची भागीदारी केली. चहलने विंडिजला या एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. चहलने मेयर्सला 1 आणि किंगला 28 धावांवर आऊट केलं. जे चार्ल्स याने 3 रन्स केल्या. निकोलस पूरन याने 41 रन्स जोडल्या. तर कॅप्टन रोवमेन पॉवेल याने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. शिमरॉन हेटमायर 10 रन्स करुन आऊट झाला. तर रोमरियो शेफर्ड 4* आणि जेसन होल्डर 6 धावांवर नाबाद परतले.
विंडिजची मालिकेत 1-0 ने आघाडी
West Indies hold their nerve and go 1-0 up in the five-match T20I series ?#WIvIND | ?: https://t.co/NfcMJQlC3w pic.twitter.com/sMBCfpSh8W
— ICC (@ICC) August 3, 2023
टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडीज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पावेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.