WI vs IND 1st Test | विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिली टेस्ट पावसामुळे रद्द होणार?
India Vs West Indies 1st Test Weather Forecast | विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
डोमिनिका | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. या सामन्याला 12 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी ही रोहित शर्मा याच्याकडे आहे. तर या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणे हा टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. टीम इंडिया विंडिज विरुद्धच्या या कसोटी मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 च्या साखळीची सुरुवात करणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही मालिका महत्वाची आहे.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना
Get ready, Dominica.??#WIvIND #WIHome pic.twitter.com/f4LNWZf66j
— Windies Cricket (@windiescricket) July 11, 2023
तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियासाठी युवा यशस्वी जयस्वाल आणि इशान किशन हे दोघे कसोटी पदार्पण करणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांचा चांगलाच हिरमोड होऊ शकतो. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. या सामन्यातील 5 दिवसांदरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याहून वाईट बातमी 2 दिवस खेळ होणार की नाही, याबाबतच शंका आहे. तसेच पहिल्या दिवसाचा खेळही वाया जाऊ शकतो.
डोमिनिका इथे हा सामना खेळवण्यात येणार आहे. डोमिनिकात आता हवामान पावसासाठी अनूकुल आहे. एक्यूवेदर या वेबसाईटनुसार, सामन्याच्या पहिल्या दिवशी अर्थात 12 जुलै रोजी पाऊस होण्याची 55 टक्के शक्यता आहे. तसेच पहिल्या दिवशी 41 किमी वेगाने वारा वाहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पावसामुळे 2 दिवसाचं काम तमाम?
एक्युवेदरनुसार, पावसामुळे सामन्यातील 2 दिवसाचा खेळ वाया जाऊ शकतो. पहिल्या दिवशी पाऊस होण्याची 55 आणि दुसऱ्या दिवशी पाऊस होण्याची 25 टक्के शक्यता आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान पावसाची एन्ट्री झाली, तर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा खेळ सुरु होण्याची प्रतिक्षा करावी लागेल.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.
टीम इंडिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी विंडिज
क्रॅग ब्रेथवेट (कॅप्टन), जर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, टेगेनारिन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.