Yashasvi Jaiswal | ‘यशस्वी भव’, जयस्वाल यांचं विंडिज विरुद्ध पदार्पणात रुबाबदार अर्धशतक
Yashasvi Jaiswal Maiden Fifty | आपल्या पदार्पणातील सामन्यात अविस्मरणीय असं काही करावं, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. तसंच यशस्वी जयस्वाल या मुंबईकर फलंदाजाने केलंय.
डोमिनिका | टीम इंडियाचा युवा आणि डेब्यूटंट बॅट्समन यशस्वी जयस्वाल याने मोठा कारनामा केला आहे. यशस्वीने आपल्या आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्धशतक ठोकलंय. यशस्वीने टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 33 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर अल्झारी जोसेफ याच्या बॉलिंगवर चौकार ठोकत पहिलंवहिलं अर्धशतक केलं. यशस्वीने अवघ्या 104 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केलं. यशस्वीने या अर्धशतकी खेळीत एकूण 7 चौकार ठोकले. यशस्वीने सामन्यातील दुसऱ्या दिवशी ही कामगिरी केली.
यशस्वी जयस्वाल याचं अर्धशतक
Yashasvi Jaiswal announces his arrival in Test Cricket! ?
A special appreciation from the teammates ?#WIvIND #YashasviJaiswal #TeamIndia pic.twitter.com/jIOKK3Fk9I
— OneCricket (@OneCricketApp) July 13, 2023
यशस्वी आठवा भारतीय
यशस्वी कसोटी पदार्पणात अर्धशतक किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा एकूण आठवा भारतीय सलामीवीर ठरला आहे. याआधी ही कामगिरी पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, शिखर धवन, अरुण लाल, सुनील गावसकर, केसी इब्राहीम आणि दिलवार हुसैन या 7 भारतीयांनी केली आहे.
यशस्वीच्या या खेळीनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याचं गॅलरीतून टाळ्या वाजवून कौतुक केलं. हेड कोच राहुल द्रविड यांनीही यशस्वीसाठी जागेवर उभं राहून टाळ्या वाजवल्या. यशस्वीचं या खेळीचं नेटकऱ्यांकडूनही कौतुक केलं जात आहे. बीसीसीआयनेही ट्विट करत यशस्वीचं अभिनंदन केलंय. यशस्वी सोशल मीडियावर ट्रेंड झालाय.
‘यशस्वी भव’
A Test FIFTY for Yashasvi Jaiswal on his debut game ??
Live – https://t.co/FWI05P59cL…… #WIvIND pic.twitter.com/TDJEQUcBBp
— BCCI (@BCCI) July 13, 2023
आता टीम इंडियाच्या चाहत्यांना यशस्वीकडून शतकी खेळीची अपेक्षा आहे. त्यामुळे यशस्वी आता काय करतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.