WI vs IND 1st Test | यशस्वी जयस्वाल रोहित शर्मा सलामी जोडीचा विंडिज विरुद्ध मोठा रेकॉर्ड

Yashasvi Jaiswal and Rohit Sharma | यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

WI vs IND 1st Test | यशस्वी जयस्वाल रोहित शर्मा सलामी जोडीचा विंडिज विरुद्ध मोठा रेकॉर्ड
मला वाटतं की यशस्वीचं द्विशतक न झाल्यामुळे तो निराशा असावा.पण तो भविष्यामध्ये खूप पुढे जाईल, असं हरजभन सिंहने म्हटलं आहे.
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 12:01 AM

डोमिनिका | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्याच डोमिनिका इथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या पहिल्या वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र विंडिजच्या खेळाडूंना आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी विंडिजला पहिल्या डावात अवघ्या 150 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाकडून आर अश्विन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर विंडिजकडून एलिक एथानझे याने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली.

त्यानंतर टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही सलामी जोडी मैदानात आली. या सलामी जोडीने टीम इंडियाला शानदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी 151 धावा करत टीम इंडियाला आघाडी मिळवून दिली. या दरम्यान यशस्वी आणि रोहित या दोघांनी अर्धशतकं पूर्ण केली. त्यानंतर या दोघांनी द्विशतकी सलामी भागीदारी केली. यासह या जोडीने आपल्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद केली. या दोघांनी इतिहास रचला.

टीम इंडियाकडून यशस्वी आणि रोहित या सलामी जोडीने विंडिज विरुद्ध विक्रमी भागीदारी रचली. या दोघांनी द्विशतकी सलामी भागीदारी करत हा विक्रम आपल्या नावावर केला.

रोहित आणि यशस्वीची विक्रमी द्विशतकी भागीदारी

रोहित आणि यशस्वी या दोघांनी 413 बॉलमध्ये ही द्वशतकी भागीदारी केली. या भागीदारीत रोहितने 85 आणि यशस्वीने 9 धावांचं योगदान दिलं. तसेच यानंतर यशस्वी आणि रोहित या दोघांनी आपली वैयक्तिक शतकंही पूर्ण केली.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.