WI vs IND 1st Test | विंडिज विरुद्ध पहिल्या कसोटीत ऋतुराज की यशस्वी? ‘या’ खेळाडूला पदार्पणाची संधी!
West Indies vs Team India 1st Test | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा 12 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.
डोमिनिका | क्रिकेट चाहत्यांना ज्या क्षणाची प्रतिक्षा होती तो क्षण आता आला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा 12 जुलै ते 16 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे डोमिनिका येथील विंडसर पार्क येथे करण्यात आलंय. विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार या तिघांना संधी देण्यात आलीय. त्यामुळे पहिल्या सामन्यात या तिघापैंकी कुणाला पदार्पणाची संधी मिळणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने सामन्याच्या पूर्वसंध्येला या तिघांपैकी कुणाला संधी देणार हे स्पष्ट केलंय. कसोटी पदार्पणासाठी यशस्वी आणि ऋतुराज दोघांच्या नावाची अधिक चर्चा होती. मात्र या दोघांपैकी एकाच्या नावावर रोहितने शिक्कामोर्तब केलंय. तसेच प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार, याची माहितीही दिलीय.
टीम इंडियाकडून कोण करणार पदार्पण?
India have identified a new opening pair and their No.3 for the first #WIvIND Test in Dominica ?https://t.co/02uKKF0vx7
— ICC (@ICC) July 11, 2023
युवा आणि मुंबईकर खेळाडू यशस्वी जयस्वाल विंडिज विरुद्ध पदार्पण करणार आहे. तर शुबमन गिल हा तिसऱ्या स्थानी खेळेल, अशी माहिती रोहित शर्मा याने दिली. तसेच प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 फिरकी गोलंदाजांचा समावेश असेल, असंही कॅप्टन रोहित म्हणाला.
टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी विंडिज क्रिकेट संघ
क्रॅग ब्रेथवेट (कॅप्टन), जर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, टेगेनारिन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.