WI vs IND Odi Series | वनडे सीरिजला गुरुवारपासून सुरुवात, विंडिज विरुद्ध भिडण्यासाठी टीम इंडिया सज्ज
West Indies vs Team India 1st Odi Live Streaming | वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी तयार आहे. उभयसंघातील या मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होत आहे.
बारबाडोस | टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेला गुरुवार 27 जुलैपासून सुरुवात होतेय. मालिकेतील पहिला सामना केनसिंग्टन ओव्हल बारबाडोस इथे खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर शाई होप याच्या कॅप्टन्सीत वेस्ट इंडिज टीम मैदानात उतरेल. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
अशी आहे आकडेवारी
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया आतापर्यंत एकूण 139 सामन्यात आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये आकडेवारीच्या दृष्टीने टीम इंडियाची बाजू मजबूत आहे. टीम इंडियाने 139 पैकी 70 सामन्यात विंडिजवर विजय मिळवला आहे. तर वेस्ट इंडिजने 63 वेळा टीम इंडियावर मात केली आहे. 2 सामने हे टाय झाले आहेत. तर 4 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
संजू सॅमसन की ईशान किशन?
या वनडे सीरिजसाठी टीम इंडियात एकूण 2 विकेटकीपर्सचा समावेश करण्यात आला आहे. ईशान किशन आणि संजू सॅमसन हे विकेटकीपरची भूमिका बजावणार आहेत. मात्र या दोघांपैकी पहिल्या सामन्यात विकेटकीपर म्हणून प्लेईंग इलेव्हमध्ये कुणाचा समावेश करण्यात येणार, याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
सामना कुठे पाहता येणार?
दरम्यान विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वनडे सीरिजमधील सर्व सामने हे टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येतील. तसेच मोबाईलवर फॅन कोड आणि जिओ सिनेमा या एपवरही मॅच लाईव्ह पाहता येईल.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरिजाठी वेस्ट इंडिज संघ | शाई होप (कॅप्टन), रोवमन पॉवेल (उपकर्णधार), एलिक एथनेज, यानिक कॅरिया, कीसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर आणि ओशेन थॉमस.