Team India | टीम इंडियातून हा खेळाडू ‘आऊट’, आता ‘या’ क्रिकेटरला संधी
Indian Cricket Team | वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या अवघ्या काही मिनिटांआधी टीम इंडियाच्या गोटातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 141 धावांनी शानदार विजय मिळवला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा कसोटी सामना हा 20 जुलै ते 24 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या अवघ्या काही तासांआधी मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. नक्की काय झालंय हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडियाला या विंडिज दौऱ्यात कसोटी मालिकेनंतर, वनडे आणि टी 20 सीरिज खेळायची आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 3 टी 20 सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी अजून संघ जाहीर झालेला नाही. मात्र त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे.
आयर्लंड विरुद्धच्या या टी 20 मालिकेसाठी ईशान किशन याला विश्रांती देण्यात येणार असल्याचं समजतंय. ईशान सातत्याने क्रिकेट खेळतोय. तसेच आगामी आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीसीसीआय ईशान किशनला आयर्लंड दौऱ्यात विश्रांती देणार असल्याचं म्हटलं जातंय. तर त्याच्या जागी संजू सॅमसन याला ईशानच्या जागी संधी दिली जाणार अशी चर्चा आहे.
आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. तसेच विंडिज दौऱ्याची सांगता ही टी 20 मालिकेने होणार आहे. टी 20 सीरिजमधील पाचवा आणि शेवटचा सामना हा 13 ऑगस्ट होणार आहे. तर आयर्लंड दौऱ्यातील टी 20 मालिकेला 18 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. तर 23 ऑगस्टला तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे विश्रांती मिळावी, या उद्देशाने ईशानला बाहेर ठेवण्यात येणार आहे.
ईशान किशन याला विश्रांती!
Ishan Kishan will reportedly be handed REST for the Ireland series ?#INDvIRE #TeamIndia #BCCI #IshanKishan #SanjuSamson #CricketTwitter pic.twitter.com/thNXyESTBv
— InsideSport (@InsideSportIND) July 20, 2023
संजू सॅमसनकडे मोठी संधी
संजू सॅमसन याच्यासाठी आयर्लंड मालिका ही मोठी संधी अशू शकते. संजूने या मालिकेत चमकदार कामगिरी केल्यास त्याचा निवड समितीकडून विचार केला जाऊ शकतो. संजूने 3 जानेवारी 2023 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये श्रीलंका विरुद्ध अखेरचा टी 20 सामना खेळला होता.
आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, 18 ऑगस्ट.
दुसरा सामना, आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, 20 ऑगस्ट.
तिसरा सामना, आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, 23 ऑगस्ट.