Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादव याला लॉटरी, विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी मोठी जबाबदारी
West Indies vs India 2023 Suryakumar Yadav | वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याच्याकडे टीम इंडियाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई | बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी एकूण 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने बुधवारी 5 जुलै रोजी रात्री ट्विट करत याबाबतची माहिती दिली. या मालिकेत अनेक खेळाडूंचं संघात कमबॅक झालंय. या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिल्याने युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा या दोघांची पहिल्यांदाच निवड करण्यात आली.
विंडिज विरुद्धच्या या मालिकेसाठी हार्दिक पंड्या टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी सूर्यकुमार यादव याला प्रमोशन दिलं आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे उपकर्णधार सूर्यकुमार कॅप्टन हार्दिक याच्यासोबत मैदानात टीम इंडियाला जिंकवण्यासाठी कशी रणनिती आखतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाची टी 20 मालिकेसाठी घोषणा
? JUST IN: Few fresh faces in India's T20I squad for the West Indies tour!
More ?https://t.co/8Za4WyCcoZ
— ICC (@ICC) July 5, 2023
विंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज वेळापत्रक
पहिला सामना, 3 ऑगस्ट.
दुसरा सामना, 6 ऑगस्ट.
तिसरा सामना, 8 ऑगस्ट.
चौथा सामना, 12 ऑगस्ट.
पाचवा सामना – 13 ऑगस्ट.
दरम्यान टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. 12 जुलैपासून या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 3 सामन्यांची वनडे सीरिज होणार आहे. तर टी 20 मालिकेने टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सांगता होणार आहे.
विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया
हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, आर. जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.