Shubman Gill | शुबमन गिल वनडे क्रिकेटमध्ये एक नंबर, मोठा रेकॉर्ड उध्वस्त
Shubman Gill West Indies vs India 2nd Odi | टीम इंडियाला विंडिज विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. मात्र या सामन्यात शुबमन गिल याने मोठा रेकॉर्ड उद्धवस्त केला.
त्रिनिदाद | रोहित शर्मा आणि विराट कोहली याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत व्हावं लागलं. विंडिजने टीम इंडियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत विजय मिळवला. विंडिजने आधी टीम इंडियाला 40.5 ओव्हरमध्ये 181 रोखलं. त्यानंतर अवघ्या 4 विकेट्स गमावून 36.4 ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं. विंडिजने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगल्या सुरुवातीनंतर ढिसाळ कामगिरी केली.
ईशान किशन आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 90 धावांची भागीदारी केली. रोमारि शेफर्ड याने ही जोडी फोडली. शेफर्डने शुबमनला आऊट केलं. शुबमनने 49 बॉलमध्ये 5 फोरसह 39 धावांची खेळी केली. शुबमन ज्या पद्धतीने खेळत होता, त्यानुसार शुबमन लवकरच अर्धशतक त्यानंतर शतक ठोकेल असं वाटत होतं. मात्र तसं होऊ शकलं नाही. पण शुबमनने या 34 धावांच्या खेळीसह वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि यासारख्या अनेक दिग्ग्ज खेळाडूंना जे जमलं नाही, ते करुन दाखवलं.
शुबमनने पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम याचा रेकॉर्ड ब्रेक केला. शुबमन वनडेतील 26 डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शुबमनने 2019 मध्ये एकदिवसीय पदार्पण केलं. शुबमनने 26 डावात 1 हजार 352 धावा केल्या आहेत. शुबमनने या दरम्यान 61.45 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच शुबमनने 1 द्विशतक, 4 शतक आणि 5 अर्धशतकं केली आहेत.
शुबमन गिल याची नंबर 1 कामगिरी
Shubman Gill tops the list ???#CricketTwitter pic.twitter.com/z1o1y7yi8e
— Sportskeeda (@Sportskeeda) July 29, 2023
सामन्याबाबत थोडक्यात पण महत्वाचं
दरम्यान शुबमन आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची घसरगुंडी झाली. शुबमननंतर ईशान किशन हा देखील आऊट झाला. ईशान किशन याने दुसऱ्या सामन्यात सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. ईशानने 55 बॉलमध्ये 55 धावा केल्या. ईशाननंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी झटपट विकेट टाकत ड्रेसिंग रुमला जाण्याची घाई केली.
संजू सॅमसन 9, अक्षर पटेल 1 आणि कॅप्टन हार्दिक पंड्या याने 7 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव 24, रविंद्र जडेजा 10 आणि शार्दुल ठाकूर याने 16 रन्स करत 50 धावा जोडल्या. त्यानंतर कुलदीप यादव याने नाबाद 8 धावा केल्या. उमरान मलिक झिरोवर आऊट झाला. मुकेश कुमार याने 6 धावांचं योगदान दिलं.
विंडिकडून गुडाकेश मोटी रोमारियो शेफर्ड या जोडीने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. अल्झारी जोसेफने दोघांचा काटा काढला. तर यानिक कॅरिया आणि जेडेन सील्स या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
त्यानंतर विंडिजकडून ब्रँडन किंग याने 15, कायले मेयर्स 36, अलिक अथानाझे 6 आणि शिमरॉन हेटमायर याने 9 धावा केल्या. त्यामुळे विंडिजची 4 आऊट 91 असा स्कोअर झाला होता. मात्र त्यानंतर कॅप्टन शाई होप आणि केसी कार्टी या दोघांनी 91 रन्सची नॉट आऊट विजयी पार्टनरशीप केली. या दरम्यान कॅप्टन होपने अर्धशतक केलं. होपने 80 बॉलमध्ये 2 सिक्स 2 फोरसह नाबाद 63 धावा केल्या. तर कार्टी 65 बॉलमध्ये 4 फोरसह 48 धावांवर नाबाद राहिला.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, अलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमारियो शेफर्ड, यानिक कॅरिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी आणि जेडेन सील्स.