WI vs IND 2nd T20I | आयसीसीची टीमच्या बॅट्समनवर मोठी कारवाई, नक्की कारण काय?
west indies vs india 2nd t20i | टीम इंडियाला विंडिजकडून सलग दुसऱ्या टी 20 सामन्यात पराभूत व्हावं लागलं.
गयाना | वेस्ट इंडिजचा विकेटकीपर बॅट्समन निकोलस पूरन याने टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात वादळी खेळी केली. पूरनने 40 बॉलमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांसह 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. पूरनच्या या खेळीमुळे विंडिजने 3 बाद 32 या स्कोअरपासून शेवटपर्यंत झुंज देत 2 विकेट्स विजय मिळवला. टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 153 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडिजने ते आव्हान 18.5 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
निकोलस पूरनने विंडिजच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. मात्र याच पूरनवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने पूरनवर दंडात्मक कारवाई केली आहे.
पूरनचं नक्की काय चुकलं?
विंडिज 153 धावांच्या पाठलागासाठी मैदानात आली. विंडिजच्या डावातील चौथी ओव्हर अर्शदीप सिंह टाकत होता. या ओव्हरमधील एक बॉल कायले मेयर्स याच्या पॅडवर लागला. अर्शदीप सिंह याने अपील केली. अंपायरने मेयर्सला बाद घोषित केलं. मात्र नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या निकोलस पूरन याला निर्णय पटला नाही.
निकोलस पूरन या निर्णयाविरोधात पंचांशी हुज्जत घालायला लागला. निकोलसने निर्णयावर टीकाही केली. त्यामुळे आयसीसीने पूरनवर कारवाई केली आहे.
निकोलस पूरनवर आयसीसीची कारवाई
West Indies batter has been penalized for flouting ICC Code of Coduct during the second T20I against India ?
Details ?https://t.co/K2BzL2lIZA
— ICC (@ICC) August 7, 2023
पंचांसोबत हुज्जत घातल्याने निकोलसच्या एका सामन्याच्या मानधनापैकी 15 टक्के रक्कम ही दंड म्हणून आकारण्यात आली आहे. निकोलसकडून आयसीसीच्या लेव्हल 1 च्या नियमाचं उल्लंघन झालंय. निकोलसने आयसीसीच्या 2.7 आचार संहितेचं उल्लंघन केलं. आयसीसी 2.7 या नियमामध्ये सपोर्ट स्टाफसोबत गैरव्यवहाराची तरतूद करण्यात आली आहे.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.