Yashasvi Jaiswal | विंडिज विरुद्ध अर्धशतक, मात्र थोडक्यासाठी यशस्वी अपयशी
West Indies vs Team India 2nd Test | यशस्वी जयस्वाल याने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतक केलं मात्र थोडक्यासाठी तो अपयशी ठरला.
त्रिनिदाद | टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केलं. यशस्वी जयस्वाल याने या पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं. यशस्वी यासह पदार्पणात शतक करणारा भारताचा एकूण 17 वा तर सलग तिसरा मुंबईकर ठरला. यशस्वीने या पहिल्या सामन्यात 171 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने विंडिजवर 1 डाव आणि 141 धावांच्या फरकाने विजय मिळवला.
यशस्वीला या शतकामुळे सलग दुसऱ्या सामन्यात पुन्हा शतक ठोकत चौथा भारतीय फलंदाज ठरण्याची संधी होती. आतापर्यंत पदार्पणापासून दुसऱ्या सामन्यापर्यंत टीम इंडियाकडून कसोटीत माजी कर्णधार मोहम्मज अझरुद्दीन, सौरव गांगुली आणि रोहित शर्मा या तिघांनी शतकी खेळी केली आहे. त्यामुळे यशस्वीला चौथा भारतीय होण्याची संधी होती.
यशस्वी जयस्वाल याचं अर्धशतक
Yashasvi Jaiswal continues his fine run from the 1st Test.
Brings up a solid FIFTY off 49 deliveries.
Live – https://t.co/d6oETzpeRx… #WIvIND pic.twitter.com/I1iUDk5XvB
— BCCI (@BCCI) July 20, 2023
यशस्वीने त्यानुसार शानदार सुरुवात केली. यशस्वीने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अर्धशतक ठोकलं. यशस्वी याने अवघ्या 49 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. यशस्वी सुंदर पद्धतीने अर्धशतक केलं. यशस्वीने अर्धशतकानंतर चांगली सुरुवात केली. आता यशस्वी दुसऱ्या सामन्यातही सलग शतक पूर्ण करणार, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र थोडक्यासाठी घात झाला. विंडिजच्या जेसन होल्डर याच्यामुळे यशस्वी सलग दुसऱ्या सामन्यात शतक ठोकण्यात अपयशी ठरला.
मात्र जेसन होल्डर याने यशस्वी जयस्वाल याला 57 धावांवर आऊट केलं. त्यामुळे यशस्वीची विक्रम करण्याची संधी हुकली. यशस्वीने 74 बॉलमध्ये 9 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 57 धावांची खेळी केली. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात डावाने विजय मिळवल्याने बॅटिंगची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात यशस्वीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.