Virat Kohli Century | विराट कोहली याचं 500 व्या सामन्यात शतक, एका झटक्यात अनेक रेकॉर्ड ब्रेक
Virat Kohli Century WI vs IND 2nd Test | वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या विराट कोहली याने खणखणीत शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.
त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने शतक ठोकलं आहे. विराटने चौकार ठोकत 180 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. विराटच्या टेस्ट क्रिकेटमधील 29 वं तर एकूण 76 वं शतक ठरलं. विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हा 500 वा सामन्यात ही कामगिरी करत सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. इतकंच नाही, तर विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत.
शतक एक रेकॉर्ड अनेक
Virat Kohli brings up his 29th Test century to go level with Sir Donald Bradman's tally ?#WTC25 | ? #WIvIND: https://t.co/AxjSsvElAf pic.twitter.com/RaTZuGAhb5
— ICC (@ICC) July 21, 2023
शॅनन गॅब्रिएल टीम इंडियाच्या डावातील 91 वी ओव्हर टाकायला आला. विराटने या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकत शतकं केलं. यासह विराटने सचिनचा मोठा रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने सचिनचा 500 व्या सामन्यापर्यंत सर्वाधिक शतकं करण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला. सचिनने 500 सामन्यांपर्यंत 75 शतकं ठोकली होती. तर विराटने या 500 व्या सामन्यात 76 वं आंतरराष्ट्रीय शतक केलं.
7 वर्षांनंतर विंडिज विरुद्ध शतक
विराटने या शतकासह 7 वर्षांची क्रिेकट चाहत्यांची प्रतिक्षा संपवली. विराटने 7 वर्षांनंतर पहिल्यांदा विंडिज विरुद्ध विंडिजमध्ये शतक ठोकलं. विराटने या आधी 2016 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर अखेरचं शतक ठोकलं होतं. तेव्हा विराटने द्विशतक केलेलं. विराटने तेव्हा विंडिज विरुज्ध 283 बॉलमध्ये 24 चौकारांच्या मदतीने 200 रन्स केलेल्या. तसेच विराटने 2018 नंतर पहिल्यांदाच परदेशात शतक ठोकण्याची कामगिरी केली.
…आणि विराटची संधी हुकली
विराटला विंडिज विरुद्ध 2016ची पुनरावृत्ती करण्याची संधी होती. विराटला शतकाचं रुपांतर द्विशतकात करता आलं असतं. मात्र विराट चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आऊट होऊन बसला. विराट सहसा रन आऊट होत नाही. त्यात टेस्ट क्रिकेटमध्ये रन आऊट होणं ही लाजीरवाणी बाब आहे. पण विराटने रन आऊट व्हायचंच ठरवलेलं. चांगली खेळी सुरु असताना विराट रन आऊट झाला. विराटने 206 बॉलमध्ये 11 फोरच्या मदतीने 121 रन्स केल्या.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.