WI vs IND 2nd Test | अखेर पाऊस थांबला, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
west indies vs team india 2nd test day 5 | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील पाचव्या दिवशी जोरदार पावसामुळे पहिल्या सत्रातील खेळ वाया गेला.
त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात त्रिनिदाद इथं दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला विजयासाठी चौथ्या दिवशी 365 धावांचं आव्हान दिलं. त्यानंतर विंडिजने चौथ्या दिवसापर्यंत 2 विकेट्स गमावून 76 धावा केल्या. त्यामुळे विंडिजला विजयासाठी पाचव्या दिवशी आणखी 289 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला 2-0 मालिका जिंकण्यासाठी 8 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे पाचव्या दिवसाचा खेळ केव्हा सुरु होतोय, अशी उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून होती.
मात्र पाचव्या दिवशी पाऊस होणार असल्याची 80 टक्के शक्यता वर्तवण्यात आली. त्यानुसार जोरदार पाऊस झाला. आता पाऊस थांबतो की नाही, असं क्रिकेट चाहत्यांना वाटू लागलं होतं. मात्र पावसाने पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रात जोरदार बॅटिंग केली. त्यानंतर पाऊस अखेर थांबला. पावसाने ब्रेक घेतल्यानंतर सामना 10 वाजून 45 मिनिटांनी सुरु होणार असल्याची माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली. मात्र अजूनही सामना सुरु झालेला नाही.
अखेर पाऊस थांबला
Sun is out!
The Day 5 action to begin at 13.15 Local Time (10.45 PM IST) ?#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/azNRfbh1OK
— BCCI (@BCCI) July 24, 2023
पहिल्या सत्राचा खेळ वाया गेल्यानंतर सामना रात्री साडे दहा वाजता सुरु होणार असल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला. मात्र साडे दहा वाजूनही सामना सुरु होईना. पावसाने पुन्हा खोडा घातला. पाऊस सातत्याने पडत असल्याने दोन्ही संघांना आणि उपस्थित क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा आणखी वाढली. पाऊस थांबून सामन्याला सुरुवात होईल, अशी आशा होती. हा सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप हिशोबाने महत्वाचा होता. त्यात टीम इंडियाला जिंकण्याची संधी होती. मात्र पावसाने उसंत घेतलीच नाही. पाऊस जोरदार बॅटिंग करतच राहिला.
पावसाची बॅटिंग थांबून पुन्हा सुरु
Rain continues to delay the start of day five in Trinidad ?#WTC25 | ? #WIvIND: https://t.co/YLBPLZeDqj pic.twitter.com/fbYdEHHcyq
— ICC (@ICC) July 24, 2023
दरम्यान पावसाचा जोर पाहून अखेर सामना ड्रॉ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसामुळे विंडिजची पराभवाचा नामुष्की टळली. तर टीम इंडियाची दुसरी मॅच जिंकून व्हॉईटवॉश देण्याचा स्वप्न भंगलं.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.