Virat Kohli vs West Indies | वेस्ट इंडिज खेळाडूच्या आईकडून विराट कोहली याचे लाड, व्हीडिओ व्हायरल
Virat Kohli Viral Video | त्रिनिदाद इथे वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी विंडिज खेळाडूच्या आईने विराटचे लाड केले.
त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडिजने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाचा पहिल्या डाव दुसऱ्या दिवशी 438 धावांवर आटोपला. तर विंडिजने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 86 केल्या. विराट कोहली याने सामन्याचा दुसरा दिवस गाजवला. विराटने आपला 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 76 वं शतक झळकावलं. विराटने यासह अनेक विक्रमही केले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दोन्ही संघ हॉटलेच्या दिशेने चालले होते. या दरम्यान विराटला सरप्राईज मिळालं. वेस्ट इंडिजचा विकेटकीपर जोशुआ दा सिल्वा याची आई विराट कोहली याला भेटली. जोशुआच्या आईचं विराटला भेटण्याचं अनेक काळापासूनचं स्वप्न पूर्ण झालं. जोशुआच्या आईच्या चेहऱ्यावर तो भाव दिसून येत होता. विराटला भेटल्याने जोशुआच्या आईला आनंद झाला. जोशुआच्या आईने विराटच्या प्रति प्रेम व्यक्त करत त्याचं कौतुक केलं. इतकंच नाही,तर विराटला मिठी मारली. विराटला प्रेमाने किस केलं.
विराटचा आणि जोशुआच्या आईचा या दोघांचा सुंदर क्षणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. या व्हीडिओत माझी आई तुला पाहण्यासाठी येणार आहे, असं जोशुआने विराटला सांगितलं. जोशुआचं हे सर्व बोलणं स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं होतं. जोशुआने जे काही सांगितलं ते एकूण विराटला आश्चर्याचा धक्का बसला.
विराट कोहली याच्यासोबत ग्रेट भेट
The moment Joshua De Silva's mother meet Virat Kohli and she hugged and kissed Him ☺️?..
One of the greatest moments ever in the history – This is so beautiful, precious!@imVkohli @mufaddal_vohra @ViratFanTeam @ImTanujSingh @BluntIndianGal @CricCrazyJohns #ViratKohli pic.twitter.com/da5trwLh4s
— Dinesh (@viratianjoy) July 22, 2023
जोशुआने जे सांगितलं ते खरं ठरलं. विराटला भेटण्यासाठी जोशुआची आई आली. विराटनेही जोशुआच्या आईसोबत काही मिनिटं चर्चा केली. मात्र यावरुन विराटचे चाहते जगभरात आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंद्रपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.