WI vs IND 2nd Test | विराट कोहली याचा दुसऱ्या सामन्यादरम्यान मोठा निर्णय

Virat Kohli | वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसरा कसोटी सामना हा टीम इंडियाच्या विराट कोहली याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 500 वा सामना ठरला.

WI vs IND 2nd Test | विराट कोहली याचा दुसऱ्या सामन्यादरम्यान मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 2:03 AM

त्रिनिदाद | टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 1 इनिंग आणि 141 रन्सने शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 साखळीतील विजयी सुरुवात केली. तसेच या विजयासह टीम इंडियाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर दुसऱ्या आणि अंतिम सामन्याला 20 जुलैपासून सुरुवात झाली. विडिंज विरुद्धच्या दुसरी टेस्ट मॅच ही विराट कोहली याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 500 वी मॅच ठरली. विराटने या 500 व्या सामन्यात खणखणीत शतक ठोकलं.

विराट टेस्टमध्ये बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावर येतो. मात्र दुसऱ्या डावात चौथ्या क्रमांकावर विराटऐवजी ईशान किशन बॅटिंगसाठी आला. ईशान चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आल्याने क्रिकेट रसिकांनी भुवया उंचावल्या. मात्र ईशानने दिवसाचा खेळ संपल्यानंतर तो चौथ्या स्थानावर बॅटिंगसाठी का आला याबाबत त्याने सांगितलं.

“मला माहिती होतं की टीम मॅनेजमेंटला माझ्याकडून काय अपेक्षित आहे. विराटने मला तुझ्या पद्धतीने खेळ असं म्हटलं. आशा आहे की आपण मंगळवारी खेळ संपवू. विराटने इतरांशी बोलून ठरवलं. विराटने स्वत: न येता मला मला पुढे खेळण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

ईशानने विराट आणि टीम मॅनेजमेंटचा विश्वास सार्थ ठरवला. ईशानने दुसऱ्या डावात बॅटिंग करताना 34 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 52 धावा केल्या. ईशानच्या कसोटी कारकीर्दीतील हे पहिलं अर्धशतक ठरलं. तसेच ईशान कसोटीत टीम इंडियाकडून वेगवान अर्धशतक करणारा दुसरा विकेटकीपर ठरला. टीम इंडियाने दुसरा डाव 2 विकेट्स गमावून 181 धावांवर घोषित केला. तसेच पहिल्या डावातील 183 धावांची आघाडी टीम इंडियाकडे होती. त्यामुळे टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 365 धावांचे आव्हान दिले.

विंडिजने चौथ्या दिवसापर्यंत 32 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 76 धावा केल्या. त्यामुळे विंडिजला पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी आणखी 289 धावांची गरज होती. तर टीम इंडियाला 8 विकेट्स हव्या होत्या. मात्र पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ होऊच शकला नाही. त्यामुळे अखेर सामना अनिर्णित राहिला.अशा प्रकारे टीम इंडियाने 2 सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.